फोटो सौजन्य - Social Media
या महोत्सवाचे आयोजन श्री तिरुपती बालाजी संस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारपासून ४ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची मालिका राबविण्यात येत आहे. यामध्ये अखंड होमहवन, पूजाविधी, भजन-कीर्तन यांसारख्या उपक्रमांचा समावेश असून, भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्य सोहळा गुरुवारी पार पडणार आहे. सकाळी १० वाजता हनुमानजींना माल्यार्पण करण्यात येणार असून, हा सोहळा बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२:३० वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भक्त याचा लाभ घेणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत केरळमधील पारंपरिक वेशभूषा पथक आणि वाद्य पथक सहभागी होणार असून, हे विशेष आकर्षण ठरणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण नांदुरा शहर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सर्व हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष फनेंद्र उरिमी तसेच नांदुरा नगरीतील नागरिकांनी केले आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडवणारा हा महोत्सव नांदुरासाठी विशेष ठरणार आहे.






