Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्…चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!

Ambulance Accident: सुट्टीवर गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! नंदुरबारच्या सावखेडजवळ रुग्णवाहिकेच्या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी; रुग्णवाहिकेत रुग्ण नसल्याने चालकावर संताप!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 19, 2026 | 03:21 PM
Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्...चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!

Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्...चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!

Follow Us
Follow Us:
  • रुग्णवाहिकेच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू; पती-पत्नी गंभीर जखमी
  • पावरा कुटुंब दुचाकीवरून गावी जाताना रुग्णवाहिकेने दिली धडक
  • रुग्ण नसतानाही चालवल्याने चालक मद्यधुंद असल्याचा स्थानिकांचा आरोप
Ambulance Accident: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सावखेड गावाजवळ एका रुग्णवाहिकेने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर पती-पत्नी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Beed News: १ कोटी ३ लाखांहून अधिकचा घोटाळा अन् कारवाईची भीती; नांदूरघाटच्या सरपंच अपात्र; फौजदारी गुन्ह्याचे आदेश!

सुट्टीवर गावी जाताना घडली दुर्दैवी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश पावरा हे आपल्या पत्नी आणि लहान मुलासह दुचाकीवरून शहादा तालुक्यातील चांदसैली येथील आपल्या गावी जात होते. सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबासोबत आनंदाने गावी निघालेल्या पावरा कुटुंबावर सावखेड गावाजवळ अचानक काळाने घाला घातला.

हेही वाचा: Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता; स्थानिकांचा संतप्त आरोप

मध्य प्रदेशमधून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या या रुग्णवाहिकेने पावरा यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यातील चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुकेश पावरा आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर तेथे मोठी गर्दी जमली. धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे संबंधित रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जबाबदार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शहादा तालुक्यातील सावखेडजवळ हा अपघात कसा घडला?

    Ans: मुकेश पावरा हे पत्नी आणि लहान मुलासह दुचाकीवरून चांदसैली गावी जात असताना मध्य प्रदेशहून गुजरातकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

  • Que: या भीषण अपघातात कोणाचा मृत्यू झाला आणि कोण जखमी झाले?

    Ans: या अपघातात पावरा दाम्पत्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर मुकेश पावरा आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: स्थानिक नागरिकांनी कोणता आरोप केला आहे?

    Ans: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नसताना हा अपघात घडल्याने चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Web Title: Nandurbar shahada savkhed ambulance bike accident child dead couple injured sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • Ambulance
  • Baby Death
  • bike

संबंधित बातम्या

Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!
1

Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!
2

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा
3

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
4

Raigad Traffic Jam: सायरन वाजत राहिला, आई-वडील आक्रोश करत राहिले, पण रस्ता मिळालाच नाही; अलिबागमध्ये चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.