धोक्याची घंटा! गावाची लोकसंख्या 7830 आणि केवळ 5 टँकरने पाणीपुरवठा,अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट
सध्या जिल्ह्यातील २४ गाव आणि वाड्यांमधील सुमारे ७ हजार ८३० लोकसंख्येसाठी ५ टॅकर कार्यरत आहेत. यामध्ये ३ गावे आणि २१ वाड्यांचा समावेश आहे. देवळा तालुक्यातील एका गावात, इगतपुरी तालुक्यातील दोन गाव व सात वाड्या तसेच सिन्नर तालुक्यातील १४ वाड्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील धरणसमूहात सध्या सुमारे 48.94 टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६०.७८ टक्के साठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ३९.३६ टक्के तर गंगापूर धरणात ६५.६३ टक्के पाणीसाठा होता. यावरून एकूण साठा वाढलेला असला तरी गंगापूर धरणातील साठा घटल्याचे स्पष्ट होत आहे. पाणीटंचाईची ही परिस्थिती कायम राहिल्यास ग्रामीण भागासोबतच शहरांनाही पाणीपुरवठ्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या भागात पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडल्याने प्रशासनाला टँकरचा पर्याय वापरावा लागत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली तरी उन्हाचा कडाका वाढत असल्याने एप्रिल व मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तापमानात वाढ झाल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून साठ्यात हळूहळू घट होत आहे.
धरणसाठा
जिल्ह्यातील साठा – 48.94%
मागील वर्षीचा साठा- 39.36%
गंगापूर धरण – 60.78%
मागील वर्षीचा साठा – 65.63%
तालुकानिहाय स्थिती
सिन्नर 14 वाडे
इगतपुरी – 2 गावे 7 वाड्या
जिल्ह्यातील पाणी स्थिती
प्रभावित गावे – 24
लोकसंख्या – 7830
टँकर 5
Ashok Kharat Case : अशोक खरातची पत्नी फरार तर मुलगा हर्षवर्धन अटकेत; ‘या’प्रकरणी पोलिसांकडून कारवाई






