187 गाव-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; पाणीटंचाईच्या झळा; प्रशासन सतर्क
187 गाव-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
पाणीटंचाईच्या झळा
प्रशासन सतर्क
नाशिक : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाच्या सरासरी प्रमाणात घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मार्च महिन्यापासून बसणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा एप्रिल महिन्यात अधिकच तीव्र होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ४० गावे व ८७ वाड्यावरील पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे.
१ जून ते ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्ह्यात १ हजार ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर २०२५ मध्ये मात्र पावसाच्या प्रमाणात घट होऊन ७७२.२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कमी झालेला पाऊस आणि त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटत चालले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने ४० गावासह ८७ वाड्यावर ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच १६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
Nashik News: पीकविम्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक; ३३४ हप्ता भरूनही फक्त १८३ रुपयांची भरपाई
प्रभावित लोकसंख्या ७४,३९५
एकूण गावे व वाड्या-१८७
टँकर सुरू-४४
येवल्यामध्ये सर्वाधिक १६ गावे व ८ वाड्या अशा एकूण ३१ ठिकाणी पाणीटंचाई आहे, त्याठिकाणी १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. त्याखालोखाल इगतपुरीमध्ये ७ टँकर सुरु करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नैसर्गिक जलश्रोतांमधील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होणार असून ग्रामीण भागामध्ये मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२६० गावांसह ५८६ वाड्यावर एकूण ४८६ ठिकाणी १६२ टँकरद्वारे फेऱ्या करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी टंचाई कृती आराखड्यात सहा कोटी ३६ लाख ४८ हजार रुपयांची तरतूद आहे. जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने पाणी टंचाई कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. सात कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांची तरतूद यात आहे.
“हा तर ‘कॉर्पोरेट जिहाद’…”; IT कंपन्यांतील महिलांच्या लैंगिक शोषणावरून नितेश राणे संतापले; म्हणाले…






