Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, मुख्यमंत्र्यांचा ‘शब्द’ की बंडखोरी पूर्ण होणार?

स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा शिंदे गटाकडे गेल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नरेंद्र दराडे यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असला तरी पक्षातील इतर दिग्गज इच्छुक आणि भाजप-ठाकरे गटाच्या हालचालींमुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 11:41 AM
नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, मुख्यमंत्र्यांचा 'शब्द' की बंडखोरी पूर्ण होणार ?

नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, मुख्यमंत्र्यांचा 'शब्द' की बंडखोरी पूर्ण होणार ?

Follow Us
Follow Us:
  • नरेंद्र दराडेंना पुन्हा संधी?
  • शिंदे गटाच्या जागेवर इच्छुकांची गर्दी
  • निवडणूक रंगणार
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा महायुतीत अखेर शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, जागा निश्चित होताच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, दोन्ही आघाड्यांमधील अंतर्गत रस्सीखेच आणि समीकरणांचे नवे अंक समोर येत आहेत. शिवसेना प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा दिलेला ‘शब्द’ पाळण्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत.परंतु, दुसरीकडे शिंदे गटातूनच इतर मातब्बर इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने आणि भाजप व ठाकरे गट गटाच्या अनपेक्षित हालचालींमुळे ही निवडणूक चुरशीची आणि गुंतागुंतीची बनली आहे.

Vidhan Parishad Election: ठाणे एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेची उमेदवारी

४ जून रोजी असणाऱ्या अर्ज माघारीच्या दिवशीच नाशिकच्या या सत्तेच्या सारीपाटाचे खरे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत नेहमीच धक्कादायक वळणे पाहायला मिळतात. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दराडे यांना दिलेल्या शब्दामुळे त्यांचे पारडे जड मानले जात असले, तरी स्थानिक पातळीवरील नाराजी आणि विरोध शमवणे हे महायुतीसमोर मोठे आव्हान असेल. ४ जून हा अर्ज माघारीचा शेवट्चा दिवस असून, यादिवशी नाशिकची ही निवडणूक दोन शिवसेनेत (शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट) थेट होणार, की भाजपच्या अंतर्गत बंडखोरीच्या किंवा मैत्रीपूर्ण लढतीच्या मदतीने निवडणुकीचा रंग पूर्णपणे बदलणार, याचा फैसला होणार आहे. तोपर्यंत नाशिकमधील इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या आणि पडद्यामागच्या गुप्त हालचाली सुरूच राहणार आहेत.

शिंदे सेनेत तिहेरी रस्सीखेंच

महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेला जाहीर झाल्यानंतर आता या पक्षाकडून आमदार नरेंद्र दराडे, अंजुम कांदे आणि विजय करंजकर यानी अर्ज घेतल्यामुळे पक्षात उमेदवारीसाठी मोठी ओढाताण सुरू आहे. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र दराडे यांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते. या शब्दावर मुख्यमंत्री ठाम राहून दराडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतात की ऐनवेळी अंतर्गत गणिते बदलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाचे मिर्लेकरांच्या दौऱ्याकडे लक्ष

महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अद्याप आपले पते पूर्णपणे उघड केलेले नाहीत. ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गिते आणि अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर, पक्षाचे संपर्कप्रमुख
रविंद्र मिर्लेकर हे सोमवारी (दि. १) नाशिक दौ-यावर येत असून, ते या दौऱ्यात महाविकास आघाडीची नेमकी काय व्यूहरचना जाहीर करतात आणि ढाकरे गट कोणाला मैदानात उतरवतो, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

भाजप ‘युतीधर्म’ पाळणार की बंडखोरी होणार?

या निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. जागा शिवसेनेला गेल्याने आता भाजपचे सर्व इच्छुक माधार घेऊन ‘युतीधर्म’ पाळणार की नाशिकमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: भाजपचे गणेश गिते यांनी मागील दोन वर्षांपासून मतदारसंघात मोठी तयारी केली होती, पक्षाच्या आदेशामुळे समजा गणेश गितेनी माधार घेतली, तरी त्यांचे बंधू गोकुळ गिते हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार का? या नव्या शक्यतेमुळे महायुतीची धाकधूक वाढली आहे.

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना

Web Title: Eknath shinde group local body constituency narendra darade candidature political tussle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा
1

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव
2

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती
3

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.