Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : पाथर्डी शिवारात भोंदू बाबा खरातची कोट्यवधीची बेनामी मालमत्ता; मूळ मालकांना धमकावल्याच्या तक्रारी

तंत्र-मंत्र व अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याने रियल इस्टेटमध्येही आपल्या राजकीय आशिर्वादाचा वापर केला. यासगळ्यात त्याने कोट्यवधीची माया गोळा केल्याचे नवनवीन प्रकरणे समोर आली आहेत

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खराताचे कारनामे
  • खरातचा रियल इस्टेटमध्येही राजकीय आशिर्वादाचा वापर
  • महिला अधिकाऱ्याच्या अपहरण नाट्यातही सहभाग ?
Nashik News : तंत्र-मंत्र व अघोरी विद्येचा धाक दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याने रियल इस्टेटमध्येही आपल्या राजकीय व शासकीय आशिर्वादाचा वापर केला. यासगळ्यात त्याने कोट्यवधीची माया गोळा केल्याचे नवनवीन प्रकरणे आता उघडकीस येऊ लागले आहे. पाथर्डी शिवारात खरात याने सात मजली इमारत बांधल्याचे व त्याच बरोबर या भागातच सुमारे ३० ते ४० एकर जमीन जागा मालकांवर दबाव टाकून खरेदी केल्याचीही चर्चा आता खुले आम होवू लागली आहे. अशाच एका प्रकरणात खरात विरूद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद देखील झाली होती. त्यामुळे खरात याच्या संपत्तीत कोणाकोणाची गुंतवणूक होती त्याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

Liquor Price Hike : मद्यप्रेमींची चिंता वाढली! विदेशी दारू महागली; ‘महाराष्ट्र मेड लिकर ‘सह बीयरला पसंती

भोंदू बाबाचे काळे कारनामे

झटपट विकास होणाऱ्या पाथर्डी शिवारात खरात याने सन २०२२ मध्ये सर्व्हे नंबर ३२७ मध्ये जागा घेवून त्याठिकाणी टोलेजंग इमारत उभारली. अर्थातच ही इमारत उभारतांना खरात याला त्याच्या शासकीय अधिकाऱ्यांचा संबंधाचा पुरेपूर लाभ झाला. इमारतीला बांधकाम परवानगी ते पुर्णत्वाचा दाखला देण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कसूर ठेवली नाही. तथापि, खराताच्या या नवीन इमारतीत येण्या-जाण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने खरात याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून लगतच्या प्लॉटधारकांच्या जागेतून जागा मिळावी यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली. तंत्र-मंत्राच्या सहाय्याने ‘तुमच्या जागा भविष्यात विक्री करू देणार नाही’ अशी धमकी खरात याने दिल्याने त्याच्या आजुबाजुच्या प्लॉटधारकांनी वर्षे-दोन वर्षे आपल्या जागेवर बांधकाम बंद केले. कालांतराने खरात याने हा नाद सोडून दिला असला तरी, त्यानंतर पाथर्डी शिवारात सुमारे ३० ते ४० एकर जागा वेगवेगळ्या माध्यमातून खरेदी केल्याचे आता स्थानिक रहिवाशी सांगत आहेत. खरात याच्याकडे जमीन खरेदीसाठी शंभर ते दिडशे कोटी रूपये कोठून आले असा सवालही केला जात आहे.

महिला अधिकाऱ्याच्या अपहरण नाट्यातही सहभाग ?

दरम्यान दोन वर्षापुर्वी इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणातही खरात याचे नाव घेतले जात आहे. त्यासाठी त्याला सिन्नरच्या एका व्यक्तीने मदत केल्याचेही आता बोलले जात आहे. सदर महिला अधिकारी काही काळ निफाड-सिन्नरला कार्यरत होती. त्यातून तिचे व खरात याचा संबंध आला. काही तरी कुरबुरी झाल्यानंतर संबंधात वितृष्टता आल्याने सायंकाळच्या सुमारास घराबाहेर शतपावली करण्यास बाहेर पडलेल्या या महिला अधिकाऱ्याचे एका कारचालकाने अपहरण केल्याची घटना घडली होती. महिलेच्या पतीने इंदिरानगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरली व महिला अधिकारी अचानक प्रकट झाली. या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला असला तरी, महिला अधिकाऱ्याचे अपहरणात नेमके कोण होते? कशासाठी अपहरण करण्यात आले हे सारे प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. खरात याच्या लैगीक प्रकरणानंतर आता त्या प्रकरणाकडेही याच अंगाने पाहिले जात आहे.

इंदिरानगरला दाखल होता अदखलपात्र गुन्हा

दरम्यान, खरात याने त्याच्या पाथर्डीच्या इमारतीच्या आजूबाजूला रहिवाशांना धमकाविण्याचे प्रकार सातत्याने सुरू असल्याचे पाहून एका जागा मालकाने थेट इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेवून खरात विरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. तत्कालीन इंदिरानगरचे पोलीस व तपास अधिकाऱ्यांनी त्यात पुढे काय केले हे अद्यापही समोर आलेले नाही. मात्र त्यावेळी एक सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने खरातला सहकार्य करीत सदरचे प्रकरण रफादफा करण्यास मदत केल्याचेही बोलले जात आहे.

Yeola News: आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका! येवल्यात कवडीमोल भाव; उत्पादकांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट

Web Title: Fraudster baba kharat amasses crores in undisclosed assets in pathardi area accused of threatening clients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.