Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : “विकासाच्या नावे सुरू असलेला विनाश थांबवा”, ऑक्सिजन मास्क घालून Gen Z उतरले शहराच्या रस्त्यावर

विकासाच्या नावाखाली होत असलेल्या पर्यावरणीय हानीविरोधात Gen Z तरुणांनी शहरात ऑक्सिजन मास्क घालून अनोखे आंदोलन केले. या माध्यमातून प्रदूषण आणि असंतुलित विकासाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 22, 2026 | 11:56 AM
"विकासाच्या नावे सुरू असलेला विनाश थांबवा", ऑक्सिजन मास्क घालून Gen Z उतरले शहराच्या रस्त्यावर (फोटो सौजन्य-Gemini)

"विकासाच्या नावे सुरू असलेला विनाश थांबवा", ऑक्सिजन मास्क घालून Gen Z उतरले शहराच्या रस्त्यावर (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • “विकासाच्या नावे सुरू असलेला विनाश थांबवा”
  • ऑक्सिजन मास्क घालून Gen Z उतरले शहराच्या रस्त्यावर
  • आंदोलनकर्त्यांनी हातात केळी घेऊन प्रतीकात्मक निषेध
नाशिक : डोंगर फोड, नदीचा बिमोड आणि बेसुमार वृक्षतोड यांसारख्या विनाशकारी विकास धोरणांविरोधात ‘पीपल्स ट्री सिटीझन मुव्हमेंट’ च्या वतीने मंगळवारी (२१ एप्रिल 2026) बी. वाय. के. कॉलेज सिग्नल ते राजीव गांधी भवन या मागांवर लढाऊ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नाशिककर व तरुणाई आणि जेन-झेड ऑक्सिजन मास्क घालून सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात केळी घेऊन प्रतीकात्मक निषेध नोंदवला. ‘हरित कुंभ’ च्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षमुक्तीच्या धोरणाचा निषेध करत नागरिकांनी घोषणाबाजी केली आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.

उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी

प्रशासनाने भूमिका बदलावी; अन्यथा तीव्र संघर्ष करण्याचा दिला इशारा

मनपाकडून विकास आणि कुंभाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जिवंत वृक्षांची तोड करण्यात येत आहे. ही प्रवृत्ती शहराच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारी असल्याची टिकाही यावेळी करण्यात आली, नागरिकापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी १० एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ५००० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.

या स्वाक्षऱ्या महापौर, मुख्यमंत्री, हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत, प्रशासनाने तात्काळ भूमिका बदलून नागरिकांना विश्वासात घ्यावे, अन्यथा संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही ‘पीपल्स दी सिटीझन मुव्हमेंट ‘तर्फे देण्यात आला
आहे. यावेळी आनंद रॉय, मानसी सरदेसाई, अदिती पटेल, दीप्ती बर्वे, डॉ कविता देवरे, जिज्ञासा जाधव, मुक्ता कावळे, निकिता जांगिड, सौकिया, योगेश गोवर्धने, मोनल कानडे, तल्हा शेख, समर रॉय, अंकिता दीक्षित, राधा शेलार उपस्थित होते. या आंदोलनाला काँग्रेड राजू देसले, मनोहर पगारे, डॉ डी एल कराड, राहुल गायकवाड, प्रफुल वाघ, विक्की गायधनी, संविधान गायकवाड, सलीम मामा शेख, अंकुश पवार, मनीष बाविस्कर, भारती जाधव, राजेश पंडित, डॉ संदीप भानोसे, अथर्व बाजीराव आदी उपस्थित होते.

महापौर अनुपस्थित उपमहापौरांना निवेदन

मोर्चानंतर प्रतिनिधी मंडळाने महापौरांना निषेदन देण्यासाठी प्रयत्न केला, मात्र महापौर अनुपस्थित होत्या, त्यानंतर उपमहापौर प्रतिनिधींशी चर्चा करतील, असे सांगण्यात आले, परंतु ३० ते ४० मिनिटे प्रतीक्षा करूनही कोणताही लोकप्रतिनिधी भेटीस आला नाही, या निषेधार्थ प्रतिनिधी मंडळाने कोणत्याही लोकप्रतिनिधींना न भेटण्याचा निर्णय घेतला आणि आपले निवेदन उपमहापौरांच्या पीए कडे सुपूर्द केले.

Nashik News: अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती

Web Title: Gen z protest oxygen mask against development destruction nashik news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Gen Z
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर
1

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.