Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये ‘शिवसंवाद’; ताफा बाजूला सारत ‘वंदे भारत’ने केला प्रवास

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये 'शिवसंवाद' दौऱ्यात आगामी निवडणुकांची रणनीती आखली. गाड्यांचा ताफा सोडून त्यांनी 'वंदे भारत' ट्रेनने प्रवास करत इंधन बचतीचा संदेश दिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 21, 2026 | 07:11 PM
खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये 'शिवसंवाद' (Photo Credit- X)

खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये 'शिवसंवाद' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये ‘शिवसंवाद’
  • ताफा बाजूला सारत ‘वंदे भारत’ने प्रवास
  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष!
नाशिक, ता. २१ मे २०२६: राज्यातील मतदार याद्यांचे पुनरीक्षण, आगामी जिल्हा परिषद निवडणूक आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आज निफाड आणि चांदवड या दोन विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला. या बैठकीसाठी खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई ते नाशिक ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास केला. या बैठकीला मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
📍शिवसंवाद दौरा – चांदवड आणि निफाड विधानसभा बैठक नाशिक येथून सुरू झालेल्या राज्यव्यापी ‘शिवसंवाद दौऱ्या’ अंतर्गत आज चांदवड आणि निफाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक शिवसैनिकांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत… pic.twitter.com/GpBPVbT82N — Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) May 21, 2026


खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, निफाड आणि चांदवडमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार यादी पुनरीक्षण मोहीम राबवली जाईल, त्यासाठी पक्ष बूथ लेव्हल एजंटची नेमणूक करत आहे. शिवसेना मतदार यादी पुनरीक्षण मोहीमेबाबत गंभीर असून पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने बीएलए नियुक्ती आणि प्रशिक्षणाचे काम पक्षाकडून हाती घेण्यात आल्याचे ते खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

ओबीसी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याने नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळाले होते. त्यामुळे राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद निवडणुकांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. शिवसंवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात नाशिकमधील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर

या आठवड्याच्या सुरुवातीला खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि देवळाली या विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर आणि इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिक दौऱ्यात ईलेक्ट्रिक वाहने वापरली होती. आज दुसऱ्यांदा नाशिक जिल्ह्याचा दौरा करताना वाहनांचा ताफा बाजूला ठेवत खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई ते नाशिक असा वंदे भारत ट्रेनने प्रवास करत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

शिवसंवाद दौऱ्यातून खासदार डॉ. शिंदे महाराष्ट्र पिंजून काढणार

शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे राज्याचा दौरा करणार आहेत. मे, जून आणि जुलै असे तीन महिने खासदार डॉ. शिंदे ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढतील. यात १०० विधानसभा मतदार संघ आणि २२ जिल्ह्यांमध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा शिवसंवाद दौरा असेल, असे पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी नाशिकमधील चार विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला.

Shrikant Shinde : “सत्तेत असताना महिला आरक्षण विधेयक फाडले..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसवर निशाणा

Web Title: Mp dr shrikant shinde nashik visit shivsamvad doura vande bharat travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • Nashik
  • shivsena

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

आमदारांना अपयश, शिवसैनिकांचा पुढाकार! वरळी कोळीवाड्यात काय घडले? Shrikant Shinde यांचे निर्देश काय?
2

आमदारांना अपयश, शिवसैनिकांचा पुढाकार! वरळी कोळीवाड्यात काय घडले? Shrikant Shinde यांचे निर्देश काय?

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
3

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.