राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!
डेहराडूनमध्ये भाजप आणि धामी सरकारविरोधात आंदोलन करताना, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला एफआयआर मागे घेण्याची मागणी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी संविधान आणि देशाचा कायदा काय सांगतो तेच सांगितले आहे आणि त्यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात हा एफआयआर हल्द्वानीमधील शुद्धीकरण वादाच्या संदर्भात दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वाल्मिकी समाजातील एका व्यक्तीने काँग्रेस नेत्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एका व्यक्तीने आरोप केला आहे की, राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यक्रमाच्याच ठिकाणी आयोजित केलेल्या एका धार्मिक कार्यक्रमाला जातीशी जोडले आहे.
या वादावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर मंचाच्या शुद्धीकरणाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु आजपर्यंत एकही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. विरोधाभास म्हणजे, जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा अस्पृश्यता आणि भेदभावाशी जोडून याला दलित समाजाचा अपमान म्हटले, तेव्हा त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
“न्यायाची मागणी करणे हा गुन्हा आहे का? असा सवालही सचिन पायलट यांनी उपस्थित केल. तसेच, एफआयआर आणि खटल्यांच्या दबावाखाली आवाज दाबला जाऊ शकत नाही. भाजपचा दलितविरोधी चेहरा उघड झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय, समानता आणि संविधानासाठी आवाज उठवत राहतील.” असंही त्यांनी नमुद केलं.
हल्द्वानी में कांग्रेस अध्यक्ष @Kharge जी के भाषण के बाद सभास्थल के हुए “शुद्धिकरण” के खिलाफ FIR दर्ज कराने के लिए कई प्रयास किए गए, लेकिन आज तक FIR दर्ज नहीं हुई। वहीं, विडंबना देखिए— इस मुद्दे को छुआछूत और भेदभाव से जोड़कर नेता प्रतिपक्ष @RahulGandhi जी ने इसे दलित समाज का… https://t.co/WklKqqZ235 — Sachin Pilot (@SachinPilot) August 31, 2026
‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत म्हटले, “भाजपच्या दलितविरोधी मानसिकतेमुळेच उत्तराखंडमध्ये गोंधळ झाला आणि विरोधी पक्षनेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाला. हे अत्यंत निंदनीय आहे.” भाजपने स्वतःच्या पराभवाच्या प्रमाणपत्रावर सही केली आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, चहा पार्टीदरम्यान त्यांना केवळ आपुलकी दिसली, जात नाही. धामींनी राहुल गांधींवर प्रत्येक गोष्टीत जात आणि भेदभाव शोधण्याचा आरोप केला आणि याला त्यांचे संकुचित राजकारण म्हटले.






