जालना : राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं. समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नाही. असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
पोलीस विभागाचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेबाबत निर्णय घेतला जाणार असून गृहमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली असून लवकर पोलिसांचा अहवाल आल्यास लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची ईच्छा आहे. असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून निर्बंध कमी केले जातील. मात्र मास्क मुक्ती सध्या नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत बैठक झाली असून साखर आयुक्तालय याबाबत योग्य निर्णय घेईल. पण शेतकऱ्यांनी धीर धरुन सहकार्य करावे. सर्व शेतकऱ्यांची ऊस तोडणी होईल असंही ते म्हणाले.
[read_also content=”‘हे’ खाल्ल्याने सेक्स लाईफमध्येही होतो फायदा! https://www.navarashtra.com/health/health/there-are-many-benefits-to-roasted-garlic-242578.html”]