Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : संशयाच्या आगीत दोन कुटुंबं उद्ध्वस्त; नवविवाहितेची दोन महिन्यांनंतर प्राणज्योत मालवली,आरोपी पती पोलिसांच्या कोठडीत

Ghansoli Crime Sayali Kadam Death: घणसोलीत मोबाईलवर आलेल्या फोनच्या संशयावरून पतीने केलेल्या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या २९ वर्षीय सायली सागर कदम यांची दोन महिने उपचारांनंतर ४ सप्टेंबर रोजी चेंबूरमधील रुग्णालयात प्राणज्योत मालवली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 09, 2026 | 08:15 PM
Ghansoli Crime Sayali Kadam Death

Ghansoli Crime Sayali Kadam Death

Follow Us
Follow Us:
  • घणसोली हादरलं!
  • दोन महिन्यांच्या झुंजीनंतर सायली कदमचा दुर्दैवी अंत
  • आरोपी इंजिनिअर पती पोलिसांच्या कोठडीत
सावन वैश्य

नवी मुंबई: माणसाला क्षणात आलेला अनियंत्रित राग आणि संशयाचे भूत एखाद्याचे हसते-खेळते आयुष्य कसे एका फटक्यात संपवून टाकू शकते, याचा मन हेलावणारा प्रकार घणसोली परिसरात उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेल्या एका फोनच्या संशयावरून पतीने केलेल्या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सायली सागर कदम (वय २९, माहेरची सायली शरद लोखंडे) या नवविवाहितेची तब्बल दोन महिने तीन रुग्णालयांत उपचारांची झुंज सुरू होती; मात्र अखेर ४ सप्टेंबर रोजी चेंबूर येथील रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी आरोपी पती सागर कदम याला अटक केली आहे.

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

रबाळे एमआयडीसीतून बेपत्ता ते लग्नाचा प्रवास

रबाळे एमआयडीसीतील एका खासगी कार्यालयात कामाला असलेली सायली अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ (बेपत्ता झाल्याची) तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी शोध घेतला असता सायली आणि सागर रामचंद्र कदम (मूळ रा. महाबळेश्वर, जि. सातारा) यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्या बेपत्ता असण्याच्या काळातच ५ जुलै रोजी सागरने सायलीवर संशय घेऊन तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली होती. या घटनेनंतर ७ जुलै रोजी दोघांनी लग्न केले अन् दोघे घणसोली येथील एका सोसायटीत (सेक्टर-७) राहू लागले. घटना घणसोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने रबाळे एमआयडीसी पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी रबाळे पोलीस ठाण्यात वर्ग केले.

पतीला वाचवण्यासाठी उराशी जपलेले गुपित

मारहाणीमुळे सायलीच्या पोटातील नाजूक अवयवाला (पॅनक्रियाजला) गंभीर इजा झाली होती. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा पतीवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये आणि नव्याने सुरू झालेला संसार टिकावा म्हणून “मी जिन्यावरून पडून जखमी झाले,” असा खोटा जबाब तिने पोलिसांना दिला होता. परंतु, वेदना असह्य झाल्यावर आणि प्रकृती खालावत गेल्यानंतर ११ ऑगस्ट रोजी तिने पोलिसांना पतीच्या अमानुष कृत्याची खरी हकीकत सांगितली.

तीन रुग्णालये अन् अखेरचा श्वास

नेरूळचे डी. वाय. पाटील रुग्णालय, खारघरचे मेडिकव्हर रुग्णालय आणि अखेर चेंबूर येथील झेन रुग्णालय… सायलीच्या कुटुंबीयांनी तिला वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. तिच्यावर गंभीर शस्त्रक्रियाही झाली, मात्र उपचारादरम्यान अतिदक्षता विभागात ( आयसीयु ) तिची दोन महिन्यांची वेदनादायी झुंज अखेर अपूर्ण राहिली. आरोपी पतीला अटक; हत्येचे कलम वाढवले. सायलीच्या मृत्यूनंतर रबाळे पोलिसांनी या गुन्ह्यात कलम वाढवले आहे. आरोपी सागर कदम याला अटक करून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेखर तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शिक्षण उच्च… पण विचारात संयम नसल्याने उध्वस्त झाली दोन कुटुंबे

या प्रकरणातील आरोपी सागर कदम हा व्यवसाय शिक्षण घेतलेला इंजिनिअर आहे. सध्या तो कंपन्यांमध्ये प्रायव्हेट गाडी चालवण्याचे काम करत होता. चांगले शिक्षण आणि ज्ञान असूनही त्या एका क्षणाच्या अनियंत्रित रागाने सर्वकाही उध्वस्त केले.

‘त्या’ एका मिनिटाच्या रागाने काय गमावले?

जीव घेण्याचा हेतू नव्हता, पण…: मारहाण करताना कदाचित आरोपीचा पत्नीचा जीव घेण्याचा थेट हेतू नसेलही, पण रागाच्या भरात घेतलेला संशय आणि मारलेले फटके एका निष्पाप तरुणीचा बळी घेऊन गेले.

आयुष्यभराचा पश्चात्ताप: एका बाजूला आई-वडिलांची लाडकी लेक कायमची दुरावली, तर दुसऱ्या बाजूला उच्चशिक्षित मुलाने केलेल्या या भयानक कृत्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवरही समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही.

समाजासाठी धडा: शिक्षण हे केवळ नोकरी किंवा पदवीपुरते मर्यादित नसावे, तर ते विचारांवर आणि रागावर ताबा मिळवण्यासाठीही महत्त्वाचे असते. संशयाची ठिणगी पडल्यास हिंसेचा मार्ग न निवडता संयम आणि संवादाने मार्ग काढणे गरजेचे आहे. शून्य मिनिटाचा राग कसा दोन कुटुंबांची पार राखरांगोळी करू शकतो, याचे हे अत्यंत चटका लावणारे जिवंत उदाहरण आहे.

PM Modi Security Breach : मोदींच्या कार्यक्रमात मोठी खळबळ; बनावट PMO ID, बंदुकधारी बॉडीगार्डसह दोघे ताब्यात

Web Title: Navi mumbai ghansoli crime sayali kadam death husband arrest rabale police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी
1

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी

Navi Mumbai Police ASI Death: नवी मुंबई पोलीस दलात खळबळ! वरिष्ठांची नावं घेत ASIने उचललं टोकाचं पाऊल
2

Navi Mumbai Police ASI Death: नवी मुंबई पोलीस दलात खळबळ! वरिष्ठांची नावं घेत ASIने उचललं टोकाचं पाऊल

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय
3

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
4

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.