Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी

वीज कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि घरात वैद्यकीय उपकरणांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना बसत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येमुळे अडचणी निर्माण होत आहेत. काही भागांमध्ये लिफ्ट बंद पडल्याने उंच इमारतीतील रहिवाशांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 08:57 AM
रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी

रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी

Follow Us
Follow Us:

एकीकडे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे नवी मुंबईकर त्रस्त असताना, दुसरीकडे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अचानक वीज कपातीमुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. शहरातील गाव गावठाण, झोपडपट्टीसह विविध नो मध्ये मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांची झोपमोड होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा काही मिनिटांसाठी नव्हे तर तासन्तास खंडित राहत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रात्री अचानक वीज गेल्याने घरांतील पंखे, वातानुकूलित यंत्रणा आणि इतर विद्युत उपकरणे बंद पडतात. उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.(फोटो सौजन्य – istock)

परिवहनमंत्र्यांची संगमेश्वर बसस्थानकाला अचानक भेट; प्रवाशांसोबत वडापावचा घेतला आस्वाद

अंडरग्राउंड केबल फॉल्ट डोकेदुखी

वीज पुरवठा खंडित होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे अंडरग्राउंड केबलमध्ये निर्माण होणारे बिघाड, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने या केबल्सवर अतिरिक्त ताण येतो. काही ठिकाणी जुन्या झालेल्या केबल्स गरम होऊन जळणे, इन्सुलेशन खराब होणे किंवा तांत्रिक दोष निर्माण होणे अशा घटना घडत आहेत. परिणामी संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा अचानक बंद पडत आहे.तांत्रिक कर्मचाऱ्यांना अशा बिघाडाचा शोध घेऊन दुरुस्ती करण्यासाठी अनेकदा काही तास लागतात. त्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ वीज खंडित राहण्याचा सामना करावा लागत आहे.

सब-स्टेशन ट्रिपिंगमुळेही वाढते आहे संकट!

वीज पुरवठा खंडित होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सब-स्टेशन आणि मुख्य फीडर लाईनवरील तांत्रिक बिघाड. विजेच्या वाढत्या भारामुळे अनेकदा फीडर ट्रिप होतात. काही वेळा सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा आपोआप बंद होते. परिणामी संपूर्ण विभागातील वीज पुरवठा ठप्प होतो. काही भागांमध्ये नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरू असतानाही वीज पुरवठा खंडित केला जातो. मात्र नागरिकांना याबाबत वेळेवर माहिती मिळत नसल्याची तक्रार वारंवार केली जात आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंडीत एसटी बसचा अपघात; सहा प्रवासी जखमी

वीज कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि घरात वैद्यकीय उपकरणांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना बसत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या समस्येमुळे अडचणी निर्माण होत आहेत. काही भागांमध्ये लिफ्ट बंद पडल्याने उंच इमारतीतील रहिवाशांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी भूमिगत केबल्सची तातडीने तपासणी करून जुन्या आणि धोकादायक केबल्स बदलण्याची मागणी केली आहे. तसेच सब-स्टेशनची क्षमता वाढवणे, अतिरिक्त फीडरची व्यवस्था करणे, वीज खंडितीबाबत वेळेवर सूचना देणे आणि आपत्कालीन दुरुस्ती पथके अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Navi mumbaikar shocked by power cut at night sleeplessness in the rising heat anger and resentment against the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • summer heat

संबंधित बातम्या

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
1

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान
2

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
3

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
4

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.