बीड : राज्यामध्ये परभणी प्रकरण आणि बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष गायकवाड यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राजकारणामध्ये देखील जोरदार टीका टिप्पणी केली जात आहे. या बीडमधील प्रकरणावरुन यापूर्वी देखील बीडचे माजी पालकमंत्री व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधून बीड हत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बीड प्रकरणाच्या प्रश्नावर संदीप क्षीरसागर म्हणाले की, “एकीकडे लोक घाबरलेले आहेत, पण त्यांच्या मनात रोष आहे. आज या घटनेमुळे जिल्ह्यात सर्व पक्षाचे लोक एकत्र आलेले आहेत. मी कोणात्याही गटाचा नाही. पण एक सर्वसामान्य माणूस, लोकप्रितनिधी म्हणून संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणऱ्या आरोपींना लकवरात लवकर अटक झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो” अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आरोपीचे नाव घेण्याबाबत लोकांमध्ये भीती आहे का या संदर्भात त्यांना प्रश्न करण्यात आला. यावर आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, “हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. गँग्स ऑफ वासेपूर ही काही प्रकरणांमुळे वस्तूस्थिती आहे. मी ज्या जाती, समाजाचा आहे, तो सुईच्या टोकाएवढा समाज आहे, तरीही मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला निवडून दिले आहे. काही राक्षसी लोक आहेत, जे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. या लोकांची सरकारने गंभीरपणे दखल घेतली, कारवाई केली, तर जिल्ह्यात असे प्रकार थांबतील. मी पहिला आमदार म्हणून मस्साजोगमध्ये गेलो. चर्चेत गावातल्या लोकांनी वाल्मिक कराडच नाव घेतलं. जिल्ह्याला माहिती आहे, ज्यांनी हत्या केली, ती सुपारी घेऊन केली, याचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे,” असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा आहे. 18 दिवस झाले तरी मास्टरमाईंड वाल्मिक कराड कुठे आहे? म्हणून आमची जिल्ह्यातर्फे विनंती आहे की, हा फास्ट ट्रॅकवर तपास घ्या, फोनचे सीडीआर तपासा. सर्व स्पष्टपणे तुमच्यासमोर येईल. सरकारला विनंती आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. गुन्हेगार निकटवर्तीय आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, तीन-चार महिन्यात पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा शपथ घ्या. आम्हाला राजकारण करायचं नाही. वाल्मिक कराडने जिल्ह्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण केले आहे. जो दोषी आहे, त्याला फासावर चढवा,” अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.