Photo Credit- Social Media (मनोज जरांगे उपोषण, मराठा आरक्षण)
जालना: आंतरवली सराटीतून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. बुधवारी (24 सप्टेंबर) मध्यरात्री राजेश टोप अचानक आंतरवली सराटीत पोहोचले. स्टेजवर मनोर जरांगे यांच्यापाशी जाऊन बसले. दोघांमध्येही काही वेळ चर्चाही झाली. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यानंतर राजेश टोपेंनी मनोज जरांगे यांच्यासहकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यानंतर काही वेळाने ते निघूनही गेले. पण त्यांच्याया भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून जरांगेंची प्रकृती खालावल्य़ामुळे राजेश टोपे यांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनंतर मध्यरात्री मनोज जरांगेंनी उपचार घेतले.
हेही वाचा: World Pharmacist Day 2024 : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त जाणून घ्या महत्त्व आणि थीम
दरम्यान,मनोज जरांगेयांच्या उपोषणाचा आज नववी दिवस आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. हे त्यांचे सहावे उपोषण आहेत. जरांगे यांचा रक्तदाब सातत्याने वरखाली होत आहे. अशक्तपणामुळे त्यांना चालण्यात आणि बसण्यातही अडचणी येत आहेत. शरीरातील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. त्यांना चक्कर येत आहेत. तरीही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील मनोज जरांगे यांची उपोषण स्थळी त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या काही झाल्यास त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरू राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहेत. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास 20 दिवस आहेत. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या दृष्टीने हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
हेही वाचा:8 वर्षांचा संसार आता मोडणार! अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांचा घटस्फोट?