Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता आम्ही भष्ट्राचार मुक्त झालो; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 29, 2024 | 03:14 PM
आता आम्ही भष्ट्राचार मुक्त झालो; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
Follow Us
Follow Us:

पुणे : शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. यापूर्वी भ्रष्टाचारावर भाजप राष्ट्रवादीला धारेवर धरत असत. मात्र आता भाजप आरोप करत नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. बारामतीतील निवावी व्हायरल पत्रावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्यावर आधी प्रहार फक्त भ्रष्टाचारावर व्हायचा. आता आम्ही भ्रष्टाचारमुक्त झालेले आहोत. मात्र आता आमच्यावर कोणतेही आरोप होत नाही. मात्र घराणेशाहीचा आरोप होतो आहे. तो आरोप मला मान्य आहे. उद्धव ठाकरे हे जेव्हा भाजप सोबत होते, तेव्हा त्यांना चालत होते. मग आता असे का?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर निनावी पत्रावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “या पत्राबद्दल मला काही माहिती नाही. मात्र आम्ही पवार कुटुंब एकत्र आहोत. जे जे निर्णय होतात ते सर्वानुमते घेतली जातात. आमच्याकडे कोणाला काय शिक्षण द्यायचे हे देखील चर्चा करुन निर्णय होतात. काही वेळा एखादे पाऊल मागे घ्यावे लागते,” असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

तसेच खासदार सुळे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपानंतर त्यांच्या झालेल्या पक्षप्रवेशावर टीका केली. “अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. हा आरोप संसदेत ऑन रेकॉर्ड केला होता. मी माझ्या कानांनी ऐकला डोळ्यांनी पाहिला आहे. यामुळे भ्रष्टाचारी कोण आहे हे देशातील जनतेला माहित आहे. माझी लढाई या दिल्लीच्या तक्ताविरोधात आहे की जो महाराष्ट्राचा विरोध करतो. देशाचे पंतप्रधान शरद पवारांवर टीका करत असतील तर ही लोकशाही आहे. यात गैर काय? याच भाजपने शरद पवारांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला. मी भाजप सरकारचे आभार मानते,” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

 

Web Title: Ncp supriya sule targeted bjp and mait shah political news maharashtra update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Ashok Chavan
  • BJP
  • political news
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?
2

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
3

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
4

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.