मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असणारा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या जनतेमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यावरुन सध्या राज्यात बरेच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहेत. (Shinde fadnvis government)
[read_also content=”राज्य सरकारच्या उदासीनतेमुळं वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, याविरोधात उद्या युवासेनेतर्फे राज्यभर निषेध मोहीम https://www.navarashtra.com/maharashtra/yuvasena-protest-against-to-state-government-325897.html”]
दरम्यान, यावरुनच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) आक्रमक झाली असून, उद्या राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मंत्रालयावर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सूरज चव्हाण (Suraj chavan) करणार आहेत. महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला पळवला. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात नेणार्या शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंदोलन करणार असून, मोठ्या संख्येन तरुणांनी यात सहभागी होण्याचे आवाहन सूरज चव्हाण यांनी केलं आहे.