फोटो - सोशल मीडिया
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या पार पडल्या. यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेमध्ये या सर्व आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडली. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीने बाजी मारल्यानंतर शरद पवार गटाचे पुरस्कृत शेकपाचे जयंत पाटील पराभूत झाले. महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक आले होते. कॉंग्रेस पक्षाची मतं फुटल्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी झाले. या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.
कोणकोणत्या उमेदवारांनी घेतली शपथ
1.पंकजा मुंडे – भाजप
2. योगेश टिळेकर – भाजप
3. अमित गोरखे – भाजप
4. परिणय फुके – भाजप
5. सदाभाऊ खोत – भाजप
6. भावना गवळी – शिंदे शिवसेना
7. कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
8. शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
9. राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
10.प्रज्ञा सातव – काँग्रेस
11. मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष






