Photo Credit- Social Media नऊ कोटींचा घोटाळा, लंकेंकडून विखेपाटलांच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?
अहमदनगर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2004 ते 2010 या कार्यकाळात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर असताना कथित साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी राधाकृ्ष्ण विखेपाटील यांच्यासह आणखी 54 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके आक्रमक झाले आहेत. निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
खासदार नीलेश लंके म्हणाले की, ” राधाकृष्ण विखे पाटली यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. आता जनतेचे रक्षकच भक्षक झाले आहेत. विखे-पाटलांवर कारवाई झाली पाहिजे. राधाकृष्ण विखेपाटलांनी जबाबदारी स्वीकारून त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. जर मंत्रीच असे काम करत असतील, शेतकऱ्यांचे पैसे खात असतील तर त्यांना भक्षकच म्हटलं पाहिजे, त्यामुळे विखे-पाटील यांनी राजीनामा द्यावा, भाजपच्या मंडळींनाही सांगणं आहे. मंत्रिमंडळात असे मंत्री नाही पाहिजे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे.
धक्कादायक ! शिक्षकाने विद्यार्थिनीला घरी बोलावलं; फोटोही मागितले अन् नंतर…
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतऱ्यांच्या पैसा बनावट कर्ज करून लाटल्याचा प्रकार आपण सभागृहातही उपस्थित करणार असल्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटलं आहे. हा सुमारे नऊ कोटींचा घोटाळा आहे. मंत्रीच असे बेताल वागत असलीत तर ते चुकीचं आहे. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विखे यांनी शेतकऱ्यांचा पैसा बनावट कर्ज करून खाल्ल्याप्रकार सभागृहात देखील उपस्थित करण्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला. हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार म्हणजे, करणार असे म्हणत, शेतकऱ्यांना नावावर कर्ज लाटलं आहे. हा सुमारे नऊ कोटी रुपयांचा घोटाळा आहे. मंत्री बेताल वागत असेल, तर ते चुकीचे आहे. त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे पुनरच्चार खासदार लंके यांनी केला.
Share Market Today: शेअर बाजार रिकव्हरी मोडमध्ये, ‘हे’ शेअर सर्वाधिक घसरले
प्रवरा सहकारी साखर कारखान्याने 2004-05 आणि 2007 या कालावधीत बेसल डोसचे पैसे वाटप करण्याच्या कारणावरून जवळपास 9 कोटी रुपयांचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतले. मात्र, या कर्जातून शेतकऱ्यांना लाभ न देता निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, हे कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफी योजनेतून माफ करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रवरा साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त तसेच संबंधित बँकांचे अधिकारी अशा एकूण ५४ जणांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.