Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “देशात लॉकडाऊन नाही, अफवा पसरवल्यास होणार जेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारने अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 27, 2026 | 03:55 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा (photo Credit- X)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • “देशात लॉकडाऊन नाही, अफवा पसरवल्यास होणार जेल”
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा
  • जाणून घ्या काय म्हणाले…
Devendra Fadnavis on Lockdown: देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे ‘लॉकडाऊन’ (Lockdown) लागणार, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अत्यंत कडक शब्दांत स्पष्टीकरण देत अफवा पसरवणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.

“फेक मेसेज फॉरवर्ड करणेही आता ठरेल गुन्हा”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारने अशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. “देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने आधीच जाहीर केले आहे. जे कोणी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवतील, त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल,” असे त्यांनी नमूद केले. केवळ अफवा तयार करणेच नाही, तर प्राप्त झालेला फेक मेसेज फॉरवर्ड करणेही आता गुन्हा ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे.

🕑 2.02pm | 27-3-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/CEL4R5YOQw — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2026

उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात

जागतिक संकट काळात इंधन दरवाढीचा भार सर्वसामान्यांवर पडू नये, यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) १० रुपयांची घट केली आहे. पेट्रोल उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून आता केवळ ३ रुपयांवर आणले आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांवरून थेट शून्यावर आणले आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा वाढीव भार आता तेल कंपन्या सोसणार असून, सामान्य ग्राहकांना अधिक दराने इंधन खरेदी करावे लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली

पुढील एक महिना पुरेल इतका साठा सुरक्षित

“भारताच्या शेजारील देशांमध्ये बिकट परिस्थिती असली, तरी भारतात इंधन आणि घरगुती गॅसची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे किमान एक महिना पुरेल इतका पेट्रोल-डिझेलचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे,” असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे अफवांच्या आधारावर नागरिकांनी पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे जनतेला आवाहन

या प्रकरणावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “देशात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. युद्धासारख्या कठीण काळात संयम बाळगणे महत्त्वाचे असून खोट्या बातम्या पसरवणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे ठरेल,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

LPG Crisis : गॅसतुटवड्यामुळे उद्योगांची चाके रुतली, सिलिंडर मिळत नसल्याने अनेक उद्योग बंद; हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Web Title: No lockdown will be imposed in the country chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Central Governement
  • CM Devedra Fadnavis
  • LPG Gas Crisis

संबंधित बातम्या

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली
1

Fuel Crisis News: शहरात इंधनाचा ‘भडका’! पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; गॅससाठी रांगा आणि महामार्गावर वाहनांची चाके थांबली

पाइपलाइन गॅस व CNG वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार
2

पाइपलाइन गॅस व CNG वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

LPG Gas Crisis: गॅस टंचाईमुळे पुन्हा येणार ‘रॉकेल युग’! शासनाचा मोठा निर्णय, पण परवानाधारकांमध्ये निरुत्साह; वाचा काय आहे कारण?
3

LPG Gas Crisis: गॅस टंचाईमुळे पुन्हा येणार ‘रॉकेल युग’! शासनाचा मोठा निर्णय, पण परवानाधारकांमध्ये निरुत्साह; वाचा काय आहे कारण?

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?
4

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.