लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये सिंधुदुर्ग- रत्नागिरीमधून खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विनायक राऊतांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यावेळी राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी विनायक राऊत म्हणाले, १६ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे.निवडणुकीच्या प्रचाराचा वेग खूप उत्साहवर्धक आहे. आनंददायी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अडीच लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवायचा हा निर्धार करून सर्वजण कामाला लागले आहेत. मी समोर कोण उमेदवार आहे याच्या काळजीत अजिबात नाही आहे. कोणीही येवो आपल्याला लढायचे आहे, आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
जिंकण्याचा आत्मविश्वास मनात ठेवून आपण कामाला लागले आहोत. हे एक आव्हान समजून आम्ही कामाला लागले आहोत. कोणीही उमेदवार येवो ही आपली निवडणूक अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्याला लढवायची असते आणि त्यानंतरच जिंकता येते. येणारा कोणी जरी असला तो आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो.रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही भाजपाची जागा आहे, ते ही जागा कोणाला द्याची हे भाजप ठरवेल. महायुतीमध्ये प्रकाश आंबेडकरांना ५ जागा देण्यात आल्या होत्या. त्यांनी त्या जागांचा स्वीकार करायला हवा होता. लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठी भाजपकडून मतदार संघांचा सर्व्हेला करण्यात आला होता. शिंदे गटाच्या सर्व्हेला महत्व द्यायची गरज नाही आणि शिंदे आणि अजित पवार गटाचे काही दिवसांत विसर्जन होईल, असे विनायक राऊत म्हणाले.