भांडुपच्या देवानंद संजय राऊत हे लाचारीची भाषा करत आहेत. लाचारीच दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहे. १० जनपथ वर बसलेल्या मम्मी समोर किती झुकाव लागत हे येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. उध्दव ठाकरे यांनी स्वतःच्या मुलाला वरळीतून निवडून आणून दाखवावे आणि मग नितीन गडकरी यांच्याबद्दल बोलावे. उद्धव ठाकरे आता तुरुतुरु फिरतात. जनतेला गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावण्याची नौटंकी केली आणि मातोश्री लपून बसले होते अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवलीत आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद
काही दिवसांपासून बंटी आणि बबली राज्यात दौरा करत आहेत. सगळीकडे फिरून भाजपावर गरळ ओकण्याशिवाय दुसरं काही करत नाहीत. रश्मी ठाकरे जेवढ्या उद्धव ठाकरेंसोबत फिरत नाय तेवढी ही बबली फिरत आहे. “ये रिश्ता क्या कहलाता है. “संशय निर्माण होत आहे. बंटी आणि बबली यांच्या समोर बसलेली गर्दी दाखवा, चार टाळकी सभेला नसतात. उबाठा पक्षाला कोणीही गांभीर्याने घेत नाही. अशा शब्दात त्यांची आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडविली.
चोरांचा सरदार अशी टीका करणाऱ्या राऊत यांनी मालकाचा मातोश्री फडणवीस यांच्यामुळे पूर्ण झाला, हे विसरू नका. तुझ्या मालकाच्या आजू बाजूला नपुसकच जास्त आहेत, त्यांना नपुंसकांचा सरदार म्हंटले तर तुम्हाला बरे वाटेल काय? त्यामुळे तोंड सांभाळून बोला असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
चोऱ्या करायच्या शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे आणि विचारलं तर त्याला छळ म्हणायचं. व्यवसाय आम्ही करतो आणि सगळे कर भरतो. रोहित पवारने उत्तर द्यावे घाबरायचं का? महाविकास आघाडीच्या बैठका होतात तेव्हा हड्डी कोणाला फेकतात. हे उद्धव ठाकरे दिल्लीला १० जनपथवर जाणार आहेत. तेव्हा कळेल असे सांगितले. ज्या जागा जिंकणार नाहीत त्याच जागा प्रकाश आंबेडकर त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी आंबेडकरी मतदार जास्त आहे, त्या जागा ते प्रकाश आंबेडकर यांना देत नाहीत. आंबेडकर नावासाठी प्रकाश आंबेडकर यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार राणे यांनी केले.
महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसने किती शाखा घेतल्या, त्याची लिस्ट जाहीर करावी लागेल. लोढांचं नाव घेऊन खडी फोडू नका. तेव्हा लोढा चालत होते आता का द्वेष करता? हिंदुत्वाच्या नावाने राज ठाकरे येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. थोड्या दिवसात समजेल कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने उभी राहील. संजय राऊत १० जनपथला जाऊन काय घासतात, कोणाच्या पाया पडतात त्याची माहिती फोटो सहित द्यावी लागेल. तुमच्या घरात काय जळतय हे पहा. उद्धव ठाकरेंच्या कामगार संजय राऊत यांना कोणी स्वीकारत नाही. ही घाण कोणाला नकोय. त्याने स्वतःची लाल करायची बंद करावे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.