File Photo : Leopard
नंदुरबार : सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड या गावात एकाने 80 वर्षीय वृध्द आदिवासी महिलेवर वे बिबट्याने हल्ला केला. वृद्ध महिलेला बिबट्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते. यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 33 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
हेदेखील वाचा : नवीन व्हायरसचा धोका असताना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना ताळे; तात्काळ सुरु करण्याची रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी आहे. यात तळोदा तालुक्यातील बहुतांश गावे, पाडा जंगल परिसरात आहे. यामुळे या भागांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर कायम पाहण्यास मिळत असतो. बिबट्यांचा वावर गाव वस्त्यांपर्यंत झाला असून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना जिल्ह्यात कायम घडत आहेत. त्यानुसार तळोदा तालुक्यात आज पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.
म्हैस वाघाच्या हल्ल्यात ठार
भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गर्रा/बघेडा- पांगडी जंगलात वाघाच्या हल्यात एक म्हैस जागीच ठार झाली. तर एक म्हैस जखमी झाल्याची घटना घडली. सुरडोह पुनर्वसन येथील पशुपालक शेतकरी नवलदास नैताम यांनी गर्रा/बघेडा पांगडी जंगल परिसरात म्हशी चारण्यासाठी गेला होता. म्हशी जंगल परिसरात चराई करत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक दोन म्हशीवर हल्ला चढवला. त्यात एका म्हशीला ठार केले; तर दुसऱ्या म्हशीलाही गंभीर जखमी केले.
500 मीटरपर्यंत नेले फरफटत
तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड या गावात सदरची घटना घडली असून, वृद्ध महिला शौचालयासाठी घराच्या बाहेर निघालेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. बिबट्याने हल्ला करत 500 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले होते. यामुळे वृद्ध महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. हल्ला करून अर्धवट खाल्ल्याच्या स्थिती मृतदेह आढळून आला होता. यामुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर वनविभाग घटनास्थळी दाखल वृद्ध महिलेचा मृत्यूदेह शुभविच्छेदनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.
हेदेखील वाचा : ब्राझीलमध्ये आणखी एक विमान अपघात ! साओ पाउलोमधील उबातुबा या पर्यटन शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एक छोटे विमान कोसळले