मुंबई – माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीत साई रिसॉर्ट बांधले आहे. एनएक्स आणि सी कोच रिसॉर्ट (Dapoli Sai Resort NX & Sea Coach Resort) कोरोनाकाळात बांधले आहे. आर्थिक गैरव्यवहार तसेच मनी लॉन्ड्रीगचा (money laundering) पैसा येथे वापरण्यात आला असल्याचा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केला आहे. तसेच माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रीगचा आरोप करत काही पुरावे ईडीकडे सादर केले होते. त्यानंतर अनिल परब (Anil Parab) यांची इडीकडून चौकशी करण्यात आली होती. मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये हे रिर्साट बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
[read_also content=”ऋतुजा लटके यांची उमेदवारी रद्द झाल्यास, ठाकरे गटातून ‘ही दोन’ नावे आली पुढे https://www.navarashtra.com/maharashtra/rituja-latke-candidate-is-cancelled-these-two-names-came-front-in-thackeray-group-335535.html”]
दरम्यान, दापोलीतील साई रिसॉर्टचे बांधकाम अनाधिकृत असून, यावर कारवाई व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. त्यामुळं इथले बांधकाम तोडण्यासाठी राज्य सरकारनं सुद्धा परवानगी दिली आहे. दरम्यान, साई रिसॉर्ट एनएक्स आणि सी कोच रिसॉर्ट (Dapoli Sai Resort NX & Sea Coach Resort) येत्या काही काळात पाडण्यात येणार आहे. सहा कोटी रुपयांचे हे रिसॉर्ट पाडण्यासाठी तब्बल १ कोटींचा खर्च येणार असल्याचं आज खुद्द भाजपा नेते किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. सोमय्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान, हे बांधकाम पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात पाडकामासाठी १ कोटींपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे. अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.