Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Price : कांदा उत्पादकांचा संताप फुटला! टाकळी ढोकेश्वरमध्ये महामार्गावर कांदा ओतून ‘रस्ता रोको’; अहिल्यानगर जिल्हा पेटणार?

Farmer Protest News: कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 15, 2026 | 02:40 PM
कांदा उत्पादकांचा संताप फुटला! टाकळी ढोकेश्वरमध्ये महामार्गावर कांदा ओतून 'रस्ता रोको'; अहिल्यानगर जिल्हा पेटणार?

कांदा उत्पादकांचा संताप फुटला! टाकळी ढोकेश्वरमध्ये महामार्गावर कांदा ओतून 'रस्ता रोको'; अहिल्यानगर जिल्हा पेटणार?

Follow Us
Follow Us:

पोपट पिटेकर,टाकळी ढोकेश्वर,अहिल्यानगर : “कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे संसार मोडले!” अशा संतप्त घोषणा देत आज पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. भररस्त्यात कांदा ओतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संघर्ष छेडला जाईल.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात झालेली मोठी घसरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. याच अन्यायाविरोधात आज सकाळी ९:३० वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील मुख्य चौकात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

पुढील वर्षी 15 लाख घरांच्या वितरणाचे उद्दिष्ट; साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

कांद्याला तातडीने रास्त हमीभाव लागू करा.

प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा.

निर्यात धोरण स्थिर ठेवा आणि जाचक अटी रद्द करा.

प्रत्येक तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करून साठवणूक क्षमता वाढवा.

“शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. आज हे आंदोलन फक्त एका गावात आहे, पण जर सरकारने कांदा प्रश्नी तात्काळ तोडगा काढला नाही, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा चक्काजाम करू,” असा आक्रमक इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.

भररस्त्यात कांदा फेकून देण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे आता सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देणार की आंदोलन अधिक चिघळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असतानाही कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील मुख्य चौकात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते एकत्र जमले. आंदोलनादरम्यान रस्त्यावर कांद्याच्या गोण्या ओतण्यात आल्या आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यातबंदीवरील निर्बंध शिथिल करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर संघर्ष उभारला जाईल, असा इशाराही देण्यात आला.

मिरा-भाईंदरमध्ये पुतळ्यावरून रणकंदन! “व्यापारी स्वार्थासाठी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा डाव”; प्रताप सरनाईकांचा भाजपवर घणाघात

Web Title: Onion price fall road block protest parner takli dhokeshwar news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय
1

Matheran News: पर्यटननगरी माथेरान अंधारात! अनेक पथदिवे बंद; रात्री पर्यटकांची गैरसोय

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
2

नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक
3

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
4

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.