Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion News: अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका; कांदा उत्पादकांची चिंता वाढली

शेती कामांसाठी सध्या मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे असते. त्यामुळे कांदा काढणे,पात कापणे व पिशवीत भरून देण्यासाठी एकरी १५ हजार रुपये घेत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 12, 2025 | 10:35 PM
Onion News: अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका; कांदा उत्पादकांची चिंता वाढली
Follow Us
Close
Follow Us:
केडगाव:  दौंड तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली असून त्याचा फटका कांदा व भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.पुन्हा दोन दिवसापासून ढगाळ  वातावरण निर्माण होत आहे.त्यामुळे कांदा उत्पादकांनी चिंता वाढत आहे.
 दौंड तालुक्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहु,पिंपळगाव, देलवडी,खुटबाव,पारगाव, कानगाव,नानगाव,गार येथील शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला कांदा भिजला आहे.शेतकर्‍यांनी आटोकाट प्रयत्न करून आपल्या शेतात उत्पादित केलेल्या कांद्याची मोठी साठवणूक केली होती.

परंतु नुकताच झालेला पाउस व या ढगाळ वातावरणाने या कांद्याची थोड्याच दिवसात  विक्री करायची, असा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे.या मुसळधार पावसामुळे कांदा पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे  शेतकर्‍यांना कर्ज फेडण्यासाठी तसेच हात उसने घेतलेल्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळे हाताला असलेला कांदा शेतकर्‍यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्याने मार्केटमध्ये कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली. त्याचा फटका दरावर बसला असून कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात पडले आहेत. सध्या तीन रुपये किलो पासून १६ रुपये किलो पर्यंत कांद्याची विक्री होत आहे. प्रतवारीनुसार कांदा विकला जात असून शेतकर्‍यांच्या पदरात सरासरी सहा ते सात रुपये दराने पैसे मिळत आहेत.

उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकर्‍याला किमान २० ते २५ रुपये किलोला दर मिळाल्यास तो फायद्याचा ठरू शकतो. मात्र सध्या कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात असून त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही.कांदा हे पीक चार महिन्यांचे असून त्यासाठी मेहनत, खुरपणी, लागवड, बियाणे, रोपे, औषध, खते, फवारणी, मजूर या सर्व बाबींचा विचार करता साधारणपणे ८० ते एक लाख रुपये एकरी खर्च येत आहे. एकरी सरासरी दीडशे ते १६० पिशवी कांद्याचे उत्पादन निघत आहे. त्यामुळे सध्याच्या दराचा विचार करता कांदा विक्रीतून शेतकर्‍याला उत्पादन खर्चाएवढेही पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्याच्या दराचा विचार करता शेतकरी संकटात असून यामध्ये सुधारणा होऊन कांद्याचे दर वाढले नाहीत, तर त्यांच्यापुढे गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

Monsoon Alert Update: ‘येत्या 4 दिवसांमध्ये राज्यात तीव्र…’; IMD ने दिला ‘हा’ महत्वाचा अलर्ट, कोकणात…

शेती कामांसाठी सध्या मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे असते. त्यामुळे कांदा काढणे,पात कापणे व पिशवीत भरून देण्यासाठी एकरी १५ हजार रुपये घेत आहेत. काढलेला कांदा शेतकर्‍यांनी आणखी दोन महिने तसाच पिशवीत बंद ठेवला तर तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या शेतकर्‍यांना कांदा चाळीत ठेवणे शक्य होत नाही किंवा त्यांना ते परवडत नाही. सध्या पैशाची गरज असल्याने उत्पादित केलेला कांदा मिळेल त्या दराने विकण्याकडे अनेक शेतकर्‍यांचा कल आहे.
१५ मे नंतर बाजार भाव वाढतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती, मात्र तसे घडले नाही. कांदा खराब होण्याच्या भीतीने तो कांदा फार दिवस स्वतःजवळ ठेवू शकत नाही. त्यातच  शेतकर्‍यांना शेतीच्या मशागती साठी  पैशांची गरज भासू लागली आहे. त्यामुळे मिळेल ते पदरात घेण्याच्या भूमिकेने शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करत आहेत.महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले आहेत .परंतु लावकरात लवकर मदत मिळण्याची तरतूद करावी.
 -महादेव धोंडीबा शेलार, शेतकरी

Web Title: Onion vegetable farmers in problem because unseasonal rain kedgaon daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 10:35 PM

Topics:  

  • baramati
  • Farmers
  • monsoon rains
  • Onion News

संबंधित बातम्या

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
1

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

आळेफाटा परिसरात कांदा काढणीची लगबग; दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात
2

आळेफाटा परिसरात कांदा काढणीची लगबग; दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
3

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Onion Price : कांदा उत्पादकांचा संताप फुटला! टाकळी ढोकेश्वरमध्ये महामार्गावर कांदा ओतून ‘रस्ता रोको’; अहिल्यानगर जिल्हा पेटणार?
4

Onion Price : कांदा उत्पादकांचा संताप फुटला! टाकळी ढोकेश्वरमध्ये महामार्गावर कांदा ओतून ‘रस्ता रोको’; अहिल्यानगर जिल्हा पेटणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.