Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांगरीचा ‘ओंकार’ कारखाना वादाच्या भोवऱ्यात! ४ महिने उलटले तरी शेतकऱ्यांचे ऊस बिल थकीत; संतापाची लाट

साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही.

  • By anuradha sagar
Updated On: May 05, 2026 | 03:53 PM
पांगरीचा ‘ओंकार’ कारखाना वादाच्या भोवऱ्यात! ४ महिने उलटले तरी शेतकऱ्यांचे ऊस बिल थकीत; संतापाची लाट
Follow Us
Follow Us:

 

Onkar Suger Factory FRP: जिल्ह्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखाना (युनिट क्रमांक ८) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून बिल थकीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. थकीत रकमेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज कारखाना प्रशासनाला निवेदन देत तातडीने पैसे अदा करण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी चार महिन्यांपूर्वीच आपला ऊस ओंकार साखर कारखान्याकडे दिला होता. मात्र, अद्यापपर्यंत या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस तोडल्यानंतर नियमानुसार निश्चित कालावधीत पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु, वारंवार पाठपुरावा करूनही कारखाना प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. यामुळे पुढील पिकांचे नियोजन, कर्जफेड आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कारखाना प्रशासनाने लवकरात लवकर थकीत बिल अदा करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील इतर ऊस उत्पादकांमध्येही नाराजी पसरली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Cabinet Decision : मोठी बातमी! आदिवासी शिक्षणाला चालना; धाराशिव-सोलापूरसाठी विशेष मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय

साखर हंगाम २०२५-२६ अधिकृतपणे संपून दोन महिने उलटले तरी, जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची एफआरपी (FRP) थकवली असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही कारखाने ऑनलाईन पोर्टलवर चुकीची माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप ऊस दर नियंत्रण मंडळाने केला आहे.

साखर कारखाने ऑफिस रेकॉर्डवर शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचे दर्शवत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप उसाचा एक रुपयाही जमा झालेला नाही. हंगाम सुरू होताना अनेक कारखान्यांनी ‘पहिला हप्ता ३००० रुपये’ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हंगाम संपल्यानंतरही अनेक ठिकाणी केवळ २००० ते २२०० रुपयांवरच बोळवण करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २७ कारखान्यांकडे ४०० कोटींहून अधिकची देणी प्रलंबित असताना केवळ मोजक्याच कारखान्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

Pune Nasrapur Bhor Case: “आरोपींना यापुढे पॅरोल…”, लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात फडणवीस

 

कारवाईची मागणी आणि इशारा

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या वतीने साखर आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाला नुकतेच एक निवेदन देण्यात आले आहे. यात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.  ज्या कारखान्यांनी १४ दिवसांच्या आत बिले दिली नाहीत, त्यांच्यावर तात्काळ साखर जप्तीची कारवाई करावी. थकीत रकमेवर वार्षिक १५% दराने व्याज देऊन ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे.
चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत.

 

 

Web Title: Onkar sugar factory unit 8 frp crisis farmers enraged over 4 month payment delay in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Beed News
  • Farmers News
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
3

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध
4

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.