कल्याण : कोट्यवधीचे कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलंय मात्र कचऱ्याची विल्हेवाट केली जात नाही, त्यामुळे कल्याण पूर्वेत कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे अशी टीका आमदार गणपत गायकवाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकारी ऑफिसमध्ये बसून करतात त्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम केलं पाहिजे असे सांगितले.
यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी डीप क्लीन कॅम्पेन ही संकल्पना राबवण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्यावेळी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यांची साफसफाई केली जाते. मात्र अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता केली जात नाही, कचराच्या कोट्यवधीच्या कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे. मात्र कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित केला जात नाही. कल्याण पूर्व येथील स्वच्छतेच्या अवस्था अत्यंत बिकट असल्याची खंत व्यक्त करत स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं आवाहन केलं. तसेच डीप क्लीन कॅम्पेन ही मोहीम सातत्याने राबवले पाहिजे अशी सूचना केली.
अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये न बसता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांना सल्ला
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांपर्यत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. घनकचरा विभागात कार्यरत असलेल्या कामगारांचा नियोजन महापालिकेने करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला विशेष निधी दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले. पुढे बोलताना रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेतील प्रभागांमध्ये स्वच्छतेचे नियोजनासाठी जबाबदारी दिली पाहिजे अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बसून काम न करता रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात काम केलं पाहिजे असा सल्ला केडीएमसी अधिकाऱ्यांना दिला. तसेच नागरिकांनी देखील स्वच्छतेबाबत सहकार्य करावे असे आवाहन केलं.