Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभक्तीने भारावलेल्या ५ हजार नागरिकांचा तिरंगा रॅलीत सहभाग

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माळशिरस अकलूज या भागातील नागरिकांमध्ये विशेषत: या भागातील तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी माळशिरस तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातून दोन तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पाच हजार नागरिकांनी सहभाग घेतला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2022 | 02:40 PM
देशभक्तीने भारावलेल्या ५ हजार नागरिकांचा तिरंगा रॅलीत सहभाग
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माळशिरस अकलूज या भागातील नागरिकांमध्ये विशेषत: या भागातील तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी माळशिरस तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातून दोन तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पाच हजार नागरिकांनी सहभाग घेतला व संपूर्ण तालुक्यात देशभक्तीमय वातावरणाची निर्मिती केली.

स्व. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना व अन्य सहकारी संस्थेच्या माध्यमातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस आजादी का अमृत महोत्सव सोहळा समिती अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व कार्याध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. भारत माता की जय, वंदे मातरम्, इंनक्लाब जिंदाबादच्या जयघोषात व देशभक्तीच्या वातावरणात तरूणाईच्या सळसळत्या जोशात अडीच हजार मोटरसायकल स्वार तिरंगा रॅली संपन्न झाली. या रॅलींचे संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साही व देशभक्तीच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. मोटारसायकलवर लावण्यात आलेल्या तिरंगा झेंड्यामुळे संपूर्ण रॅली मार्ग तिरंगामय झाली होती.

ही रॅली शंकरनगर, सदुभाऊ चौक, माळीनगर, २५/४, महाळूंग, श्रीपूर, बोरगांव, माळखांबी, बोंडले, वेळापूर, खंडाळी, माळेवाडी, प्रतापसिंह चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, सदुभाऊ चौक मार्गे विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे पोहोचली. माळशिरस तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातून आलेल्या दोन्ही रॅली अकलूज येथील क्रिडा संकुलात पोहोचल्यानंतर या रॅलीचा प्रवाह एका मोठ्या तिरंगारुपी महासागरात रूपांतरित झाला होता.

[read_also content=”महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी ट्रकखाली चिरडून ठार https://www.navarashtra.com/maharashtra/two-college-students-were-crushed-to-death-under-a-truck-nrdm-314804.html”]

“आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त केंद्र शासन आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवित आहे. त्याच अनुषंगाने माळशिरस -अकलूज या भागातील तरुण पिढी मध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण करणे व बलशाली राष्ट्र निर्मितीमध्ये तरुणाईचा सहभाग घेणे व या भागातील नागरिकांमध्ये जाज्वल राष्ट्रभक्ती निर्माण करणे यासाठी माळशिरस तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागातून दोन तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.”

– धैर्यशील मोहिते पाटील (कार्याध्यक्ष, स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा समिती, अकलूज)

Web Title: Overwhelmed with patriotism 5 thousand citizens participated in the tricolor rally nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 02:40 PM

Topics:  

  • Malshiras
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
1

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
2

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
4

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.