कल्याण: कल्याण डोंबिवलीत (Kalyna Dombivali) काका म्हणून परिचित असलेले गजानन माने गेली ३२ वर्ष समाजकार्य करत आहेत. त्यांच्या समाजकार्याची दखल सरकारने घेतली असून त्यांना पद्मश्री पुरस्कार (Padmashri Award) जाहीर करण्यात आला आहे. बारा वर्षे भारतीय नौदलात सेवा करुन ते निवृत्त झाले. तेव्हापासून आतापर्यंत सलग ३२ वर्ष त्यांनी कुष्ठरोगांसाठी अविरत कार्य केलं. काही वर्षांपूर्वी स्थानिक भारतीय सैन्य दलात तरुणांनी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं आणि विविध उपक्रम राबविण्याचं काम ते करत आहेत. आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी देखील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने गजानन माने यांचा सत्कार केला. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माने यांच्या कुटुंबियांनी देखील आनंद व्यक्त केलाय.
[read_also content=”शाहरुखचा ‘पठाण’ ठरला बॉक्स ऑफिसचा बादशहा, दोन दिवसांमध्ये वर्ल्डवाइड कलेक्शन ‘इतक्या’ कोटींच्या पार https://www.navarashtra.com/movies/pathaan-movie-worldwide-box-office-collection-nrsr-364896.html”]
डोंबिवलीत राहणारे गजानन माने हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी भारतीय नौदल सेनेमध्ये १२ वर्ष सेवा केलेली आहे. तसेच भारत-पाकिस्तानच्या सन १९७१ च्या युद्धातदेखील सहभाग घेतलेला आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवेचा वसा अंगीकारला. गेल्या ३२ वर्षांपासून कुष्ठरोग निर्मुलन कार्यात त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. कुष्ठरोग्यांसाठी शिक्षण त्यांचे आरोग्य याकडे त्यांनी लक्ष दिले. तसेच त्यांना उत्पन्नाचे साधन देखील गजानन माने यांनी महापालिकेमार्फत मिळवून दिले. गजानन माने यांचे मार्गदर्शन आणि प्रयत्नांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुष्ठरोगनासाठी राज्यातील पहिलं रुग्णालय उभारण्यात आलं आहे.
महापालिकेने नेहमी केलं सहकार्य – माने
हे कार्य करताना महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील आवश्यक ते उल्लेखनीय सहकार्य वारंवार केलेले आहे असेदेखील माने आवर्जून सांगतात. तसेच २०१८ पासून त्यांचे लक्ष आपल्याकडील तरुण मुला- मुलींना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरणा देणे हे असून, त्याकरिता विविध शाळांमधून मार्गदर्शन शिबिरे लावणे तसेच त्याबाबत कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता ही सेवा अखंडपणे त्यांनी चालू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या माध्यमातून मुलांना स्फूर्ती मिळावी यासाठी काही मॉडेल्स आणि काही युद्ध स्मारके महापालिकेच्या माध्यमातून देखील साकारण्याचा प्रयत्न सुरु आहे.