Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नुकतेच पालघर - छ. संभाजीनगर बसचा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 17, 2025 | 06:58 PM
खराब रस्त्यामुळे पालघर - छ. संभाजीनगर बसचा अपघात

खराब रस्त्यामुळे पालघर - छ. संभाजीनगर बसचा अपघात

Follow Us
Follow Us:
  • पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात
  • खराब रस्त्यामुळे झाला अपघात
  • 3 गंभीर तर 20 हून अधिक जखमी
दीपक गायकवाड/मोखाडा: पालघर-वाया वाडा-खोडाळा मार्गे नाशिककडे जाणारी छ. संभाजीनगर बस (क्रमांक MH 06 – 9570) ही श्रीघाट–देवगांवदरम्यान देवगांव फाट्याजवळील वळणावर अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत ३ प्रवासी गंभीर तर २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जखमींना तत्काळ खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही प्रवाशांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचे निवडले आहे. शाहनुरुबी खान (60) यांना हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी पुढे संदर्भित करण्यात आले.

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार

अपघात कसा झाला?

पालघर आगाराची ही बस सकाळी ७ वाजता सुटून नाशिककडे जात होती. श्रीघाट–देवगांवदरम्यान तीव्र वळणावर रस्ता खराब असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्टीवरून घसरत काही अंतरावर कोसळली.

या अपघातात शिवराम झुगरे यांच्या नाक-तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता, तर चंद्रकांत शिद यांच्या बरगडीला दुखापत झाली. याशिवाय नसीमा शेख (26, बुलढाणा), सूरज देहाडे (42, आव्हाटे), सोनाली देहाडे (30), अपेक्षा देहाडे (17), कल्याणी देहाडे (14), दिव्याक्षी देहाडे (12), सिद्धार्थ देहाडे (09), सीता खाडगीर (33), जानकी मानकरी (60), बेबी पारधी (60), बुधी पारधी (65), रुपाली बरफ (13) यांसह अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

“चालकांकडून वेगावर नियंत्रण आवश्यक” – प्रवाशांची प्रतिक्रिया

या मार्गावर बसचालक अनेकदा अति वेगाने वाहन चालवतात, अशी तक्रार प्रवाशांनी व्यक्त केली. सुर्यमाळ, खोडाळा, श्रीघाट आणि देवगांव हे डोंगराळ व नागमोडी वळणाचे भाग असल्याने चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रवाशांचे मत आहे.

खड्ड्यांनी भरलेला रस्ता – स्थानिकांची संतापजनक प्रतिक्रिया

श्रीघाट–देवगांव या केवळ ३ किमी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गेल्या ७–८ वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था कायम आहे. या मार्गावर आधीही अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे “रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी” अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे. या अपघातानंतर खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Palghar sambhajinagar bus accident due to bad condition of road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 06:58 PM

Topics:  

  • palghar
  • Palghar news
  • Road Accident

संबंधित बातम्या

पालघरमध्ये साकारणार भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ; अरबी समुद्रात उभे राहणार ४५ हजार कोटींचे महाप्रकल्प
1

पालघरमध्ये साकारणार भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ; अरबी समुद्रात उभे राहणार ४५ हजार कोटींचे महाप्रकल्प

मान्सून ट्रेक ठरला थरारक! धुक्यामुळे तंदुळवाडी किल्ल्यावर सहा पर्यटक भरकटले; 112 वर कॉल करताच सुरू झाले रेस्क्यू ऑपरेशन
2

मान्सून ट्रेक ठरला थरारक! धुक्यामुळे तंदुळवाडी किल्ल्यावर सहा पर्यटक भरकटले; 112 वर कॉल करताच सुरू झाले रेस्क्यू ऑपरेशन

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral
3

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral

Mira Bhayandar News : नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मुर्धा गावावर शोककळा
4

Mira Bhayandar News : नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मुर्धा गावावर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.