पतंगोत्सवाला गालबाेट! चायनीज मांजामुळे एकजण जखमी, गळ्याला पडले 18 टाके
वसई/ रवींद्र माने : संक्रांतीच्या निमित्ताने पतंगोत्सव साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे. संक्रांतीनिमित्ताने शहरातही मिळेल तसं पतंग उडविण्याता आनंद घेतला जातो. मात्र याटच पतंगोत्सावाला गाालबोल लागल्याची घटना वसईमध्ये घडली आहे. पतंग उडवताना मांजा वापरण्याबााबत शासनाकडून आवाहन केलं जात असूनही खुलेआमपणे मांजा वापरण्यात येत आहे. याच मांज्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात असल्याचं वसई शहरात दिसून आलं आहे.
चायनीज मांजा गळ्याभोवती आवळला गेल्यामुळे मराठी एकीकरण समितीचे विक्रम डांगे गंभीर जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाली आहे.
मांज्यामुळे गळ्याला गंभीर जखम झाली असल्याने डांगे यांना १८ टाके घालण्यात आले.
Santosh Deshmukh: ‘वडिलांना उचललं अन् आता काकाला काही…’; देशमुखांच्या लेकीने फोडला आर्त टाहो
विक्रम डांगे हे रविवारी सायंकाळी मुलगा आणि पत्नीसह दुचाकीवरुन फेरफटका मारण्यासाठी निघाले होते.वसई पुर्वेकडील मधुबन परिसरात ते आले असताना,अचानक त्यांच्या गळ्याभोवती चायनीज मांजाने फास आवळला आणि त्यात त्यांचा गळा चिरला गेला.ही घटना पाहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने डांगे यांना जवळच्या हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या गळ्यावरील जखमेवर १८ टाके घालण्यात आल्याचे डांगे यांनी सांगितले.
महिन्याला हप्ता दे नाहीतर, मी…; पुण्यात गुंडाकडून व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
मधुबन येथील मैदानात सुरक्षा स्मार्ट सिटीचा पतंग महोत्सव सुरु होता.त्यातील पतंगाचा नायलाॅन मांजा डांगेंच्या गळ्याभोवती आवळला गेला डांगे यांच्या गाडीचा वेग अत्यंत कमी असल्यामुळे ते बचावले.या पतंग महोत्सवासाठी बाऊंसर तैनात करण्यात आले होते.मात्र,पतंगाच्या मांजामुळे कोणालाही दुखापत होऊ नये,त्यापासून जवळून जाणाऱ्या वाहनचालकांना नागरिकांना सावध करण्यासाठी महोत्सवाच्या आयोजकांनी कोणतीही उपाययोजना केली नव्हती.हा अपघात घडल्यानंतरही बाऊंसर मदतीसाठी धावून आले नाही.असे अपघात पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितले.तर हा कार्यक्रम अधिकृत नव्हता,त्याला कोणी परवानगी दिली,नायलाॅनचा मांजा वापरणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार,खुलेआम विक्री आणि वापर करणाऱ्यांवर पोलिस-पालिका कधी कारवाई करणार असे प्रश्न डांगे यांनी उपस्थित केले आहेत.
मांज्यामुळे अनेकांना नाहक जीव गमवावा लागलेला आहे. प्रशासनाने मांज्यावर बंदी घातली असतानाही बाजारात अजूनही खुलेआमपणे नायलॉन आणि चायनीज मांजा मिळत आहे. दरम्यान ऐन संक्रांतीच्या तोंडावर अनेकांना या चायनीज मांज्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील आता अॅक्शन मोडवर कामाला लागली आहे. झालेला प्रकार पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी पोलीसांकडून नागरिकांना मांजा न वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.