मोखाडा तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार!
दीपक गायकवाड/मोखाडा: मोखाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना या पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश भाजपाची जिल्हा कार्यकारणी बैठक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने डहाणू येथे १० ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.
बैठकीदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष बदलत भाजपात प्रवेश केला, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष आणि मोखाडा नगरपंचायतचे गटनेते प्रमोद कोठेकर यांनी भाजपात प्रवेश करताच शरद पवार गटाच्या मोखाडा तालुक्यातील संघटनात्मक शक्तीला मोठा फटका बसला आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील तसेच भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
Devendra Fadnavis: “नागपूरमधील ‘कन्व्हेन्शन सेंटर’साठी…”; CM देवेंद्र फडणवीसांच्या सूचना
या वेळी मोखाडा नगरपंचायतचे नगरसेवक गटनेते प्रमोद कोठेकर, माजी तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी, नगरसेविका उषा पवार व वैशाली धूम, सरपंच मनोहर नवले, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव पाटील, कार्याध्यक्ष ऋषिकेश लाडे, तालुकाध्यक्ष सौरभ खरोटे, तसेच राहुल बोराडे, मनोज पाटील, अक्षय लाडे, पप्पू भूसारा, महेंद्र धूम, महादू खिरारी, युवराज हडळ, चेतन नवले, सुनील करबट, दिलीप हाडळ, रवींद्र दिवे, ईश्वर हाडळ, रमेश घाटाळ, रघुनाथ भोये, तुळशीराम वाघ, सोमनाथ झूगरे, नरेश आणि एकनाथ हाडोंगा, संदेश मोरगाव वाकडपाडा, रोहित कानात, अभिषेक पारधी, गोरख सारकते यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे मोखाडा तालुक्यात भाजपाचे संघटन अधिक बळकट झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपासाठी उर्जादायी ठरला आहे. स्थानिक पातळीवर पक्षात नवचैतन्य आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.