वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi’s six-hitting record : वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडूची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्याने आपल्या फलंदाजीच्या शैलीने त्याने एक वेगळी छाप पाडली आहे. तो विदेशात जाऊयान धुमाकूळ घालतो. वैभव सूर्यवंशीने दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल ५० षटकार मारले आहेत. सूर्यवंशीने आतापर्यंतच्या १९ वर्षांखालील क्रिकेट कारकिर्दीमध्ये भारताच्या प्रतिस्पर्ध्यांच्या भूमीवर जाऊन हे षटकार ठोकले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी वैभव सूर्यवंशीच्या षटकारांच्या या संख्येत १९ वर्षांखालील आशिया कप सारख्या बहु-राष्ट्रीय स्पर्धा वगळण्यात आल्या आहेत. म्हणजेच, आपण फक्त द्विपक्षीय मालिकांबद्दल चर्चा करत आहोत.
हेही वाचा : IND vs WI: यशस्वी जयस्वालची ऐतिहासिक डरकाळी!148 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडले असे काही; वाचा सविस्तर
वैभव सूर्यवंशीने द्विपक्षीय मालिकेत भारतीय अंडर-१९ संघाच्या कोणत्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या भूमीवर जाऊन षटकार मारले आहेत. त्याने वैभव सूर्यवंशी त्याच्या अंडर-१९ कारकिर्दीत आतापर्यंत या दोन देशांमध्ये जाऊन खेळला आहे. भारताच्या अंडर-१९ संघाने या दोन्ही देशांमध्ये आपले वर्चस्व दाखवले आहे. या मालिकांमधून वैभव सूर्यवंशी एक प्रमुख खेळाडू म्हणून समोर आला आहे. वैभव सूर्यवंशीने मारलेले ५० षटकार हे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांमध्ये आहेत, ज्यामध्ये एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही प्रकारांचा समावेश आहे.
वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील कारकिर्दीत आतापर्यंत भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५४ षटकार लगावले आहेत. त्या ५४ षटकारांपैकी त्याने १८ षटकार ऑस्ट्रेलियामध्ये ठोकले आहेत. यापैकी नऊ षटकार तेथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ठोकले आहेत. तर नऊ षटकार त्याने दोन बहुदिवसीय सामन्यांमध्ये ठोकले आहेत.
वैभव सूर्यवंशीकडे इंग्लंडमध्ये सर्वाधिक षटकार लगावले आहेत. त्याने १९ वर्षांखालील स्तरावर तेथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये २९ षटकारांचा पाऊस पाडला आहे. तसेच तेथे त्याने दोन बहुदिवसीय सामन्यांमध्ये देखील तीन षटकार ठोकले आहेत.
वैभव सूर्यवंशीने आपल्या कारकिर्दीत सर्वात कमी षटकार आपल्या मायदेशात म्हणजे भारतात गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन बहुदिवसीय सामन्यांमध्ये लगावले आहेत. ज्यामध्ये त्याने चार षटकार मारले आहेत.