पालघर/ सचिन मोरे : विक्रमगड नरगपंचायत कार्यक्षेत्रातील गाव पाडयांसाठी विविध भागात नियमित पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. लोकसंख्येचा आढावा घेऊन नविन विस्तारीत पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत होणे गरजेचे आहे. लोकसंख्येनुसार नविन योजनेचा प्रस्ताव तयार करुन मोठया स्वरुपाची विस्तारीत पाणी योजना कार्यान्वीत होणे गरजेचे आहे. कारण सध्यस्थित असलेली फिल्टर नळ योजनेची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने प्रत्येक वार्डमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. तर पावसाळयात पाणी फिल्डर क्षमता कमी होत असल्याने गढुन पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नविन सुसज्ज विस्तारीत पाणी योजेना मंजुर करुन त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.त्यावेळी पालकमत्री गणेश नाईक याचेकडे असलेला 2007 चा पाणी योजनेचा प्रस्तावात जुन्या जलवाहिन्या बदणे गरजेप्रमाणे नविन जलवाहिन्या टाकण्याची कामे करण्यात येणार होती. या योजनेमुळे विक्रमगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पाणी प्रश्न सुटणार होता.
विक्रमगड येथील खांडच्या बंधा-यांतून येणारे पाणी जाकवेल विहीरच्या माध्यमातून विक्रमगड नगरपंचायतत कार्यक्षेत्रातील विविध भागात पाणी पुरविले जाते. परंतू हे पाणी पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या एकाच बाजूने असल्याने दुसर्या बाजूने नळ जोडणी जोडतांना, घेतांना रोड खोदून घ्यावे लागते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कुठे पाईप लाईन फुटण्याचे प्रकार तर त्यामधून पाणी वाया जाण्याचे प्रकार तर लिकेज होऊन गढूळ पाण्याव्दारे जंतू संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.सद्यस्थितीत असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून येणारे पाणी सर्व नगरपचायत रहिवाशी क्षेत्रात पुरविणारी पाईप लाईन एकतर्फा असल्याने पूर्ण भागापर्यंत पाणी पुरविण्यास अनंत अडचणी येत असतात. तर नगरपंचायतीला मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याने नगरपंचायतीकडून नविन प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
या प्रस्तावात जाकवेल विहीरपासून पूर्ण पाईप लाईन बदलण्यात येणार आहे. मेन पाणी पुरवठा करण्याच्या दोन्ही जल वाहिनी, टाकीपासून दुतर्फा, रोडच्या दोन्ही बाजूने टाकण्यात येणार आहे. या पाईप लाईनमधून येणारे पाणी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध भागात पोहचविण्याची व्यवस्था उत्तमरित्या करण्यात येणार आहे.
विक्रमगड शहराचे नागरिकीरण झपाटयाने वाढत चालेले असल्याने नळपाणीपुरवठा लाईन बदलणे आजच्या घडीला खूप गरजेचं आहे .तसंच विक्रमगड नगरपंचायतचे उत्पन्न देखील कमी असून त्यामध्ये अनेक कामे करावी लागत असतात. त्यामुळे नगरपंचायतीस निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी होत आहे. तरी संबंधीत नवनिर्वाचीत पालकमंत्री गणेश नाईक व लोकप्रतिनिधींनी पाण्याचे गांभीर्य लक्षात घेता नविन पाणी योजनेची अंमलबजावणी होणे व त्याअनुशांगाने पाठपुरावा करुन एक सक्षम पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करणे गरजेचे आहे तसा प्रस्थाव नगरपंचायकडे तयार आल्याचेही समजते.






