Free Fire Max: गेममध्ये आणखी एका नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार गोल्ड कॉइन जिंकण्याची सुवर्णसंधी
प्लेअर्स फ्रीमध्ये हे गोल्ड कॉईन क्लेम करू शकणार आहेत. यासोबतच प्लेअर्सना वेपन लूट क्रेट आणि स्पेशल थीम्ड हेड वेयर देखील जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व गेमिंग आयटम्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करण्याची गरज नाही. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या या ईव्हेंटबाबत आणि एक्सक्लूसिव रिवॉर्डबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – you tube)
फ्री फायर मॅक्समध्ये गेमर्ससाठी Patamon Has You Covered! ईव्हेंट जारी करण्यात आला आहे. हा ईव्हेंट 27 नोव्हेंबरपर्यंत गेममध्ये सुरु असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान प्लेअर्स टास्क पूर्ण करून 1000 गोल्ड कॉईन अनलॉक करू शकणार आहेत. यासोबतच Xtreame Adventure वेपन लूट आणि Takeru & Patamon हेड गेयरला अनलॉक करण्याची संधी देखील प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये मिळणार आहे.
Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे ‘हे’ फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं






