Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News:पालखेड कालव्याला गुरूवारी पाणी, निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचं शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

येवला तालुक्यातील पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती.यासाठी आमदार दराडे, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 12:56 PM
Nashik Palkhed Canel

Nashik Palkhed Canel

Follow Us
Close
Follow Us:
  • पालखेड कालवा लाभक्षेत्रात ‘या’ तारखेला पाणी सोडण्याचा निर्णय
  • जानेवारीअखेरीस विहिरींनी तळ गाठला
  • शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटणार
Nashik Palkhed Canel:येवला तालुक्यातील दक्षिण पश्चिम पट्टयातील पालखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आवर्तन सोडावे यासाठी शिवसेनेच्या वतीने पालखेड विभागातील वरिष्ठ अधिकारी भागवत यांना सांगण्यात आले आहे. तालुक्यातील ४८ हजार हेक्टर जमिनीला पालखेड कालव्याचे पाणी मिळते, त्यातील ८७ पाणी वाटप सोसायटी आहेत. या सर्वांना आता २५ फेब्रुवारीलाच पाणी मिळणार आहे.
जानेवारीच्या अखेरीस तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. पालखेड डावा कालव्याच्यात मागील आवर्तनाचा बऱ्याच वितरिकांना पाणी न गेल्यामुळे यंदा पाण्याचा प्रश्न लवकर उभा राहिलेला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्याकडे याबाबतचे गाऱ्हाणे मांडले होते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

स्थानिक नेत्यांचं म्हणणं काय?

“८८ तालुक्यातील शेतीच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन पालखेड येथील कार्यकारी अभियंता भागवत यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता पाणी २५ फेब्रुवारीलाच सुटणार आहे. शेतकऱ्याऱ्यांनी याबाबत कुठलेही चिंता करू नये”, असं विधान आमदार किशोर दराडे यांनी केलं आहे.
“८८ तालुक्यातील बऱ्याच शेतक-यांनी आमच्या शिवसेना कार्यालयाशी संपर्क केला. शेतकऱ्यांनी आम्हाला वेळीच सावध केल्याने आमदारांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत तत्काळ पाणी सोडण्यास सांगितले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने सांगितल्याप्रमाणे पाणी २५ तारखेलाच येणार यात काहीही शंका नाही”, असं विधान येवल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांनी केले आहे.

शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटणार

“मागील आवर्तनामध्ये आम्ही वितरिकांना पाणी घेतले नाही, कारण अवकाळी पावसाने आमच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होते. त्यामुळे वितरिकांना पाणी घेता न आल्यामुळे आज विहिरीने पूर्णपणे तळ गाठला आहे. आत्ताच्या पिकांना तत्काळ पाण्याची गरज असल्यामुळे लवकर पाणी मिळावे.”, अशी अपेक्षा धुळगावचे शेतकरी दिलीप सोनावणे यांनी व्यक्त केली. घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत यांच्याशी संपर्क करून पाणी १ मार्चला नव्हे तर फेब्रुवारीलाच आपण सोडावे, याबाबतची विनंती केली. २५ तालुकाप्रमुख शेळके पाटील यांनी ही सर्व बाब शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या लक्षात आणून दिली.

त्यानंतर त्यांनी तत्काळ पालखेड डावा कालव्याला पत्रव्यवहार केला आणि संबंधित अधिकारी भागवत यांना २५ फेब्रुवारीला पाणी सोडण्याच्या सूचना केल्या. त्यावर भागवत यांनी, आम्ही १ मार्चला नव्हे तर फेब्रुवारीलाच पाणी सोडू, असे आश्वासन आमदार दराडे व शेळके पाटील यांच्यासोबत आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आता कांदा, टरबूज, गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना पाण्याचा फटका बसणार होता, परंतु त्यांना आता लवकरच पाणी मिळणार आहे.
त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

Nashik News: वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी? द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

Web Title: Palkhed canal water release thursday shiv sena executive engineer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • farmer
  • Nashik News
  • Nashik News Update
  • Water Crisis

संबंधित बातम्या

धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु
1

धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन
2

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का
3

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का

राजस्थानमध्ये टॅफेच्या JFarmचे उद्घाटन; शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना सबलीकरणाचा प्रयत्न
4

राजस्थानमध्ये टॅफेच्या JFarmचे उद्घाटन; शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना सबलीकरणाचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.