पाचगणीत घोडे मालकांचे व्हेरीफिकेशन होणार
वाई : पाचगणी टेबल लँड वर आलेला प्रत्येक पर्यटक हा घोड्या सवारी करत असतो ही सवारी करत असताना काही पर्यटकांकडून जादा शुल्क आकारले जाते अशी तक्रार प्राप्त झाली असल्यामुळे पाचगणी नगरपालिकेने आठ जानेवारीपासून प्रत्येक घोडा चालकांसाठी व त्यांना सहाय्य करणाऱ्या मदतनिसांसाठी व्हेरिफिकेशन बंधनकारक केले आहे
पर्यटनामध्ये वाढ व्हावी व पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी प्रत्येक पर्यटक हा आपल्यासाठी राजा आहे अतिथी देवो भव या श्लोक प्रमाणे पाचगणीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाबरोबर प्रत्येक व्यवसायिकाने वागणे अपेक्षित आहे व पर्यटकांकडून किती प्रमाणात शुल्क घ्यावे या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पाचगणी पोलिस, नगरपालिका पालिका प्रशासन आणि घोडे व घोडागाडी व्यावसायिकांमध्ये आज झालेल्या संयुक्त बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले. यावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले टेबल लॅन्ड पठारावर परवानाधारक घोडे व्यावसायिकांशिवाय इतर लोकांचा शिरकाव झाला आहे.
घोडे व्यावसायिकांकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात,परवाच बाहेरच्या राज्यातील न्यायाधीशाकडून फार मोठ्या प्रमाणात पैसे घेण्याची हिंमत घोडे व्यावसायिकांकडून झाली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील तडीपार गुन्हेगार, अल्पवयीन मुले घोडे सवारी व घोडागाडीवर कामाला ठेवण्यात आली आहेत.आपल्या काही चुकांमुळे सध्या पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर टेबल लॅन्डवर अवाच्या सव्वा पैसे घेतल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यापुढे टेबल लॅन्डवर जे परवानाधारक घोडे मालकांचे व त्यांच्या मदतनीसाचे व्हिरीफिकेशन बंधनकारक आहे.त्याचबरोबर बाहेरील तडीपार व्यक्ती पाचगणीत खपवून घेतला जाणार नाही. ७ फेब्रुवारी पर्यंत सर्वांनी व्हिरिफिकेशन व घोड्यांचे पासींग करून घ्यावे. ८ तारखेपासून फक्त परवानाधारक घोड्यांनाच व्यवसाय करता येईल.त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत पर्यटकांकडून किती पैसे घ्यायचे हे पालिका व पोलिस प्रशासनाकडून ठरवण्यात येईल.
हेही वाचा: Panchgani Crime: पाचगणीत बारबालांचा पुन्हा धिंगाणा; 20 जणांना बेड्या, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
ठरवलेले दर हे बोर्डावर लावण्यात येतील व त्यावर पोलिस स्टेशन व पालिकेचा नंबर टाकण्यात येईल.हे बोर्ड इंग्रजी व मराठीत लावण्यात येतील.नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.त्याचबरोबर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल.आपण सर्वांनी व्यवस्थित शिस्त लावून घेतली तर सर्वांना व्यवसाय मिळणार आहे त्याचबरोबर पाचगणीच्या नावाला धक्का लागणार नाही. कसल्याही प्रकारची नशा करून व्यवसायावर येता येणार नाही. टेबल लॅन्ड पठारावर दोन गट झाले असून दोन युनियन झाल्या आहेत.त्याला जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहे.असा प्रकार कोणी करू नये.पाचगणी महाबळेश्वर येथे कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले ८ तारखेला पालिका व पोलिस पथक टेबल लॅन्ड पठारावर असणार आहे.ज्याचा घोडा पासींग नसेल त्याला टेबल लॅन्डवर प्रवेश दिला जाणार नाही.आणि मोहीम केवळ एक दिवसाची राहणार नाही.जे घोडे व्यावसायिक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.त्याच बरोबर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल.
यावेळी घोडे व्यावसायिकांच्या समन्वयातून घोडागाडी राऊंड चार ते पाच व्यक्तींसाठी १६०० रुपये, घोडा एंजॉय राऊंड ३००,गोलपस राऊंड ६००,सहा पाॅंईट १२५०, नव पाॅंईट २५०० रुपये असे सांगण्यात आले.येत्या दोन दिवसांत यावर विचार विनिमय करून पालिका व पोलिस प्रशासनाकडून ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,सपोनि बालाजी सुनवने, मुख्याधिकारी निखिल जाधव,कार्यालयीन अधीक्षक प्रणव पवार,आरपीआयचे युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे,शहर अभियंता अभिजित सोनावले, लेखापाल विनायक येवले, जयंती गुजर, नितीन मर्ढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटकांची गैरसोय होऊ नये व पर्यटकांकडून जादा पैसे घोडे मालकांकडून घेण्यात येऊ नये यासाठी पाचगणी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या कडून काही निर्बंध व नियम घालण्यात आलेले आहेत यामध्ये परवानाधारक घोडेमालकांचे व त्यांना मदत करणाऱ्या मदतनिसांचे व्हेरिफिकेशन बंधनकारक केलेले आहे त्याचबरोबर घोडा मालकांनी आपले घोडे पासिंग करून घेणे हे आता बंधनकारक असणार आहे या प्रस्तावा बाबत आज नगरपालिका हॉलमध्ये पोलिस, पालिका प्रशासन आणि घोडे व घोडागाडी व्यावसायिकांमध्ये आज झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आली या बैठकीत प्रशासन व घोडे मालक यांच्यात चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले.
ऊंड ६००,सहा पाॅंईट १२५०, नव पाॅंईट २५०० रुपये असे सांगण्यात आले.येत्या दोन दिवसांत यावर विचार विनिमय करून पालिका व पोलिस प्रशासनाकडून ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार,सपोनि बालाजी सुनवने, मुख्याधिकारी निखिल जाधव,कार्यालयीन अधीक्षक प्रणव पवार,आरपीआयचे युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,बांधकाम विभाग प्रमुख रवि कांबळे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे,शहर अभियंता अभिजित सोनावले, लेखापाल विनायक येवले, जयंती गुजर, नितीन मर्ढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.