श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर केल्यामुळे नव्या वादाची ठिणगी
पंढरपूर: श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी मंदिर प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी देवांच्या अभिषेकासाठी स्थानिक चंद्रभागा नदीचे पाणी न वापरता उत्तर प्रदेशातील गंगाजल आणले जात आहे.
वारकरी संप्रदायासाठी विठोबाइतकाच चंद्रभागा नदीचा महिमा मानला जातो. “जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा” अशी ख्याती असलेल्या या नदीचे महत्त्व दुर्लक्षित होत असल्याचा आरोप अंकुशराव यांनी केला आहे. जसा गंगाजलाचा वापर महापूजेसाठी केला जातो, तसाच पवित्र चंद्रभागेच्या पाण्याचाही अभिषेकात समावेश व्हावा. यासाठी चंद्रभागेचे पाणी विठ्ठल-रुक्मिणींपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अंकुशराव यांनी केली आहे.