पनवेल : भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती ताज्या रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी शासन निर्देशानूसार 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत आज दिनांक 09 क्रांती दिनाच्या निमित्ताने पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार श्री.प्रशांत ठाकूर बोलत होते.
आजची तरूण पिढी स्वत:ला मिलेनिअर म्हणून घेते, या तरूण पिढीला देशाचा विकास करायचा आहे, देशाचा विकास करताना स्वत:चे कर्तृत्व सिध्द करायचे, कर्तृत्व सिध्द करताना इतिहासाचे विस्मरण होऊ नये, तसेच आपल्या ज्वाज्वल्य इतिहासाच्या खुणा आपल्यामध्ये सतत ताज्या ठेवण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम राबवला जात आहे. असे प्रतिपादन आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांनी केले.
यावेळी आयुक्त श्री.मंगेश चितळे, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त संतोष वारूळे, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, माजी नगरसवेक, महापालिका अधिकारी कर्मचारी, स्वातंत्रसैनिकाचे उत्तराधिकारी, पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त श्री. मंगेश चितळे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यानिमित्ताने आयुक्तांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ पनवेल महानगरपालिकेमार्फत साजरा केला जाणार आहे. शासन निर्देशानूसार 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आज आज दिनांक 09 क्रांती दिनाच्या निमित्ताने तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रिब्यूट कार्यक्रम पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानामध्ये घेण्यात आला. यामध्ये माजी सैनिक, स्वातंत्रसैनिकांचे वारसदारांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी स्वातंत्रसैनिकांचे उत्तराधिकारी आणि माजी सैनिक रावसाहेब आभाळे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी वसंत खरे, अनिल आचार्य, यतिंद्रनाथ ठाकूर, अनिल निकम, प्रमोद पानसरे, स्वातंत्रसैनिकांचे उत्तराधिकारी यांचा यावेळी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना उपायुक्त कैलास गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण मोहकर यांनी केले. तसेच आभार सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांनी केले.