Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prabhani: सावधान! उन्हाचा वाढता धोका; परभणीत उष्माघाताने घेतला पहिला बळी, 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

परभणीत उष्माघाताचा पहिला बळी नोंदला गेला. नाशिकहून आलेल्या 37 वर्षीय शिवाजी कांबळे यांना उन्हामुळे चक्कर येऊन ते खड्ड्यात पडले. दीर्घकाळ उन्हात राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 01:03 PM
maharashtra (फोटो सौजन्य: social media)

maharashtra (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • परभणीत उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
  • चक्कर येऊन खड्ड्यात पडल्याने जीव गमावला
  • प्रशासनाने उन्हापासून बचावाचे आवाहन केले
परभणी: परभणी जिल्ह्यातून उष्मघाताचा पहिला बळी नोंदवण्यात आला आहे. आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीचे तीव्र उन्हामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना परभणीतील नांदखेडा रोड भागात घडली आहे.

Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिवाजी कांबळे असे आहे. ते मूळचे जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी आहे. कामासाठी ते नाशिकला स्थायिक झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबासह परभणीत विटभट्टीवर काम करणाऱ्या भावाकडे आले होते. 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास शिवाजी कांबळे आपली पत्नी मीनाक्षी, मुलगी विद्या आणि सासू यांच्यासह साडू विजय मस्के यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत जात असतांना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांच्या मुलीने चक्कर आल्याचे पहिले मात्र त्यांनतर ते बेपत्ता झाले होते.

पालथ्या अवस्थेत आढळून आला

दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने ही माहिती भाऊ महादेव कांबळे याना दिली. बराचवेळ त्यांचा शोध घेतला असता नांदखेडा रोडवरील एका खड्ड्यात शिवाजी यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला आढळून आला. शिवाजी यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे शरीर कडक झाले होते आणि पाठ व हातावर तीव्र उन्हामुळे त्वचा करपल्याचे व्रण दिसत होते. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.

अकस्मात मृत्यूची नोंद

विटभट्टी मालक देशमुख यांच्या गाडीतून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर महादेव बबन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण आहे. शिवाजी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Ashok Kharat case: अशोक खरातच्या जीवाला धोका! सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: शिवाजी बबन कांबळे (वय 37), मूळ जिंतूर तालुक्यातील.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: उन्हामुळे चक्कर येऊन खड्ड्यात पडले व उष्माघाताने मृत्यू झाला.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: परभणीतील नांदखेडा रोड परिसरात.

Web Title: Parbhani caution rising heat threat heatstroke claims first victim in parbhani37 year old man dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Heat Waves
  • maharashtra
  • Summer

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.