चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील लॉ कॉलेज समोर एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने शुक्रवारी शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी सदर व्यक्तीची ओळख पटविली असून गिरीश पद्मावार (६०) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. परंतु, मृत व्यक्ती ही कुठल्या कारणाने जळाली. हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
[read_also content=”जुन्या वैमनस्यातून तंटामुक्त अध्यक्षाची हत्या, दोन तासांत खुनाचे गूढ उलगडले, अल्पवयीनासह दोघांना अटक https://www.navarashtra.com/maharashtra/dispute-free-president-assassinated-due-to-old-enmity-murder-mystery-unraveled-in-two-hours-two-arrested-along-with-minors-nraa-272601.html”]
लॉ कॉलेज येथील सुरक्षारक्षकाला या भागात आगीचा जोरदार भडका होताना दिसून आला. दरम्यान लागलीच त्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, पर्यंत सदर व्यक्ती आगीत जळाला होता. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व तपास सुरू केला. सदर घटनास्थळी मृत व्यक्तीची दुचाकी व पेट्रोलची कॅन आढळून आली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर व्यक्तीचे नाव गिरीश पद्मावार असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सदर व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.






