Nagpur: नागपूरच्या हिंगणात चोरांचा धुमाकूळ; ५ बंगल्यांची घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास
प्रशासकीय कामात त्यांनी बऱ्यापैकी सुधारणा केल्याचे बोलले जात असले तरी, लोकांचे प्रश्न सोडविण्यात फारसे प्रभावी नव्हते, असा सूर राजकीय वर्तुळात होता. चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत शहरातील बड्या नेत्यांनी बरेचदा त्यांच्या बदलीची मागणी केली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, काँग्रेस शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, भाजप आ. प्रवीण दटके यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे व दटके यांनी कचरा संकलनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून आयुक्तांना घेरले होते. गडकरींनी महापालिकेत जनता दरबार घेऊन प्रशासनाला खडेबोल सुनावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर चौधरी यांची सुमारे पावणेतीन वर्षांनंतर बदली करण्यात आली.
नवे आयुक्त कोण ? चर्चेला उधाण
अभिजित चौधरी यांची पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकडे सूत्रे सोपवून नवीन पदभार लगेच स्वीकारण्याची सूचना बदली आदेशात केली. महापालिकेचे नवे आयुक्त कोण असतील, याची उत्सुकता पदाधिकारी, नगरसेवकांसह अन्य अधिकारी-कर्मचारी व राजकीय चळवळीतील कार्यकत्यांना लागली असली तरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात येत असल्याने तेच नवे आयुक्त राहतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर
Ans: पुणे येथे, पुणे महानगर विकास प्राधिकरणात.
Ans: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे.
Ans: निवडणुकीनंतर प्रशासक कार्यकाळ समाप्त; कार्यपद्धतीवर टीका.






