घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. सतत सर्दी खोकला झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. सर्दी खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केले जाते. पण सतत पेनकिलर खाल्ल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आलेपाक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कोरड्या खोकल्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आलेपाकचा एक बारीक तुकडे दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा चावून खावा. यामुळे घशात वाढलेली खवखव आणि इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. घरी तयार केलेल्या आलेपाकमध्ये साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कोणतीही पोहचणार नाही. आलं खाल्ल्यामुळे केवळ सर्दी खोकलाच नाहीतर पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस, ऍसिडिटी किंवा अपचन झाल्यास आलेपाकचा एक बारीक तुकडा चावून खावा. यामुळे तात्काळ आराम मिळेल. चला तर जाणून घेऊया आलेपाक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






