KDMC चा वेगळाच घाट, पालिका निवडणुकीआधी दुरुस्ती (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कल्याण: आगामी महापालिका निवडणूक घेण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका सज्ज झाली असून निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या दालनांच्या दुरुस्तीचा घाट पालिकेतील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी घातला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील लोकप्रतिनिधींच्या कायर्यालयांसह पालिका अधिकारी व महत्वाच्या विभागाच्या कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागातील अभियात्यांसह पाहणी सुरू केली आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार जाहीर
सर्वच पालिका, नगर पालिका व जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्या नंतर निवडणूक घेण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिका सज्या झाली असून प्रभाग रचना जाहीर झाल्या नंतर येत्या काही दिवसात प्रभागातील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आगामी निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दालनाच्या दुरुस्ती कड़े पालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
आगामी पालिका निवडणुकीची आचारसंहिता मुख्यालयातील लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्गाच्या दालनाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू असून लाखो रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्याचा घाट घातला जात आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील लोकप्रतिनिधी राजवट नोव्हेंबर २०२० साली संपुष्टात आली त्यानंतर पालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आल्या नंतर आजमिती पर्यंत पालिकेचा कारभार प्रशासन सांभाळीत आहे. २०१९-२०२० साली कोरोनाच्या पादुभांवा मुळे पालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने निवडणुका आज घेतील उद्या घेतील असे म्हणता म्हणता तब्बल पाच वर्ष वर्षाचा कालावधी लोटला तरी पालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त मिळत नव्हता.
KDMC News : ‘कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा’; स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बांधकाम विभागाचे अभियंता सरसावले
आगामी निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही महिन्यांनी लागणार असल्याने पालिका मुख्यालयातील विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींची कार्यालये तसेच पालिका अधिकारी प्रशासनाच्या महत्याच्या विभागाच्या कार्यालयांची धगडुजी सेव दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाचे अभियंता सरसावले आहेत. चंदाच्या आर्थिक संकल्पात इमारत डागडुजी, दुरुस्ती व अन्य केली जाणान्या कामासाठी तरतूद केलेला निधी खर्च करून लाखोंच्या खाचांची कामे करण्यासाठी पालिका मुख्यालयातील महत्याच्या अधिका-याच्या केबिन बंद असलेल्या कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पाहणी करून कामे करून घेण्यासाठी या असे सुनावले.
वर्कऑर्डर काढण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ
दुरुस्तीच्या कामाची लाखो रुपयांच्या निविदा कळण्यासाठी लगबग सुरू केली आहे. आचार संहितेपूर्वी या कामाची एस्टिमेट बनवून निविदा काढून वर्कऑर्डर काढण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी धावपळ करीत असल्याचे दिसून येत आहे लोकप्रतिनिधी राजवट नसल्याने प्रशासनाच्या मंजुरी कामे करून घेण्या आपल्या हित संबंधित ठेकेदाराला ही कामे मिळवून देण्यासाठीचा घाट रचला जात आहे. नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची कार्यालयाची दुरुस्ती रागरंगोटी करून आचारसंहितेचा बागुलबुवा करून कोट्यावधी रुपयांची दुरुस्तीची कामे मंजूर करून घेतली.
ई टेंडरिंग द्वारे निविदा काढून कामे
पालिका मुख्यालयातील लोकप्रतिनिधी इमारत व प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांची पाहणी करून दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जगदीश कोरे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली. डागडुजी व दुरुस्तीची कामे मोठ्बा खर्चाची असल्याने ही कामे करण्यासाठी ई टेंडरिंग द्वारे निविदा काढून कामे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच वर्षे कार्यालये बंद
कल्याण डोंबिवली पालिकेचे कल्याण येथे मुख्यालय असून प्रशासकीय इमारत व लोकप्रतिनिधी इमारत अशा दोन इमारती आहेत प्रशासकीय इमारतीत आपल्याला आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांसह शहर अभियंता व अन्य महत्त्वाच्या विभागांसह अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. तर लोकप्रतिनिधी इमारतीत सचिव कार्यालय तसेच विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधीची कार्यालये आहेत. केडीएमसीवर प्राशासकीय राजवट असल्याने २०२० साली लोकप्रतिनिधीच्या कार्यकाळ संपल्याने तेव्हापासून आजमिती पर्यंत पालिकेतील विविध लोकप्रतिनिधींच्या पक्षाच्या गटनेते, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, महापौर, उपमहापौर यांच्या कार्यालयांना ट्राले लावण्यात आल्याने गेली पाच वर्षे ही कार्यालये बंद अवस्थेत आहेत.






