पाटणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, शेतकरी हतबल
Patan News: मल्हारपेठ( वा) नावडी वसाहत येथील वेताळबा देवालय परिसरात शेतकऱ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने कोंबड्याचा फडशा पाडला आहे अशा घटना वारंवार घडू लागल्या आहत वनविभाने गांभीर्याने दक्ष राहून घटनास्थळी येऊन माहिती घ्यावी अशी शेतकऱ्यानी मागणी केली आहे.
पाटण तालुक्यातील नावडी वसाहत येथे वेताळबा माळावर अनेक दिवसापासून हैदोस घातला आहे. काल रात्री दहाच्या सुमारास लोंढे वस्थी मध्ये गोठ्यात घुसून बिबट्याने खुराड्यातील कोंबड्यांचा फडशा पडला आहे. तसेच शेजारी असलेल्या आंब्याच्या बागेत विश्रांती घेऊन पुन्हा पुन्हा एका रात्री चार वेळा हल्ला केला. या परिसरात गेला महिनाभर या बिबट्याने पुन्हा पुन्हा अनेकांच्या गोठ्यात घुसून गाईची वासरे शेळ्या कोंबड्या आशावर हल्ला करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या शेताची वरात बिबट्याला त्याचे भक्ष्य सापडेना म्हणून तो नावडी वसाहत वेताळवाडी परिसरात महिनाभर तळ ठोकून बसला आहे.
Ind vs WI : KL Rahul ची मोठी झेप! विराट-रोहित जोडीच्या खास यादीत सामील; WTC मध्ये केला ‘हा’ कारनामा
तसेच शेजारी असलेल्या खिलारवाडी सोनाइचीवाडी असलेल्या गावातील गोठ्यात घुसून लहान जनावरांना फरफडत नेऊन फडशा पडला आहे . तसेच पाठीमागील काही दिवसापासून एकापाठोपाठ एक अशी पाळीव कुत्री फरफडीत नेऊन नुकसान केले. याचबरोबर गेल्या दोन दिवसांपूर्वी नावडी येथील खिलारवाडी येथील मराठी शाळेजवळ अन्न भक्ष्याच्या शोधासाठी दबा धरून बसला होता . . सध्या खिलारवाडी, वेताळवाडी गावच्या शेताशिवारात भात सोयाबीन भुईमूग या पिकाची काढणी सुरू असून बिबट्याच्या वाढलेल्या दहशतीने महिला शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.