Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC SIR Campaign 2026: भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण; ३० जूनपासून घरभेटीद्वारे मतदार पडताळणी

PCMC News : भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून, मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४८३ बीएलओ आणि ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 26, 2026 | 10:34 AM
PCMC News, Bhosari Constituency, BLO Training, Voter List Revision,

PCMC News, Bhosari Constituency, BLO Training, Voter List Revision,

Follow Us
Follow Us:
  • भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या अधिकृत वेळापत्रकाची आणि नियमांची सर्व अधिकाऱ्यांना माहिती देणे
  • घरोघरी जाऊन मतदारांची अचूक माहिती प्रगणना पत्रकात कशी नोंदवायची आणि कागदपत्रांची कायदेशीर पडताळणी कशी करायची याचे थेट प्रात्यक्षिक
  • मतदार यादीतील दुबार नावे, मृत मतदार किंवा पत्ता बदललेल्या नागरिकांची नावे वगळून यादी पूर्णपणे पारदर्शक व त्रुटीरहित करणे
 

 PCMC SIR  : भोसरी विधानसभा २०७ मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या तयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि नवनियुक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रगणना पत्रक भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच घरभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृत्यचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर

भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून, मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४८३ बीएलओ आणि ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. यावेळी प्रगणना पत्रके भरून घेण्यात येणार असून, मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले की, मतदार यादी अद्ययावत आणि त्रुटीरहित ठेवण्यासाठी घरभेटींच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. नागरिकांनी प्रगणना पत्रकातील माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करावे.

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज

प्रगणना पत्रकात अद्ययावत मोबाईल क्रमांक नमूद करावा. कुटुंबातील सदस्यांचे मॅपिंग चुकीचे असल्यास अथवा इतर विसंगती आढळल्यास ती बीएलओंच्या निदर्शनास आणून द्यावी. आवश्यक तेथे संबंधित कागदपत्रे सादर करून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी सतीश थेटे यांनी केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अजिंक्य येळे, परशुराम वाघमोडे तसेच नायब तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी विकी परदेशी उपस्थित होते.

Web Title: Pcmc bhosari assembly constituency 207 blo training voter list special revision sir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Election Campaign
  • PCMC News
  • SIR

संबंधित बातम्या

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
1

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश
3

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर हटणार: बायोमायनिंग प्रकल्पासाठी 4.13 कोटींचा निधी मंजूर
4

मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर हटणार: बायोमायनिंग प्रकल्पासाठी 4.13 कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.