Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News: KYC न केल्यास पेन्शन बंद, कराडमधील ७११ लाभार्थ्यांना अंतिम इशारा; ३० मार्चपर्यंत आधार प्रमाणीकरण अनिवार्य

कराड तालुक्यातील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या ७११ लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही. ३० मार्च २०२६ पर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पेन्शन बंद होणार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 19, 2026 | 08:40 PM
KYC न केल्यास पेन्शन बंद, कराडमधील ७११ लाभार्थ्यांना अंतिम इशारा (Photo Credit- X)

KYC न केल्यास पेन्शन बंद, कराडमधील ७११ लाभार्थ्यांना अंतिम इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • KYC न केल्यास पेन्शन बंद
  • कराडमधील ७११ लाभार्थ्यांना अंतिम इशारा
  • ३० मार्चपर्यंत आधार प्रमाणीकरण अनिवार्य
कराड/प्रतिनिधी : विशेष सहाय्य योजनांअंतर्गत पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांची पेन्शन थेट बंद केली जाणार असल्याचा इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे. कराड तालुक्यातील तब्बल ७११ लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नसल्याचे समोर आले आहे.

संजय गांधी निराधार योजना, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने पेन्शन जमा केली जाते. मात्र, या प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरणासह केवायसी करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याबाबत तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लाभार्थ्यांना यापूर्वीही वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अनेकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता लेखी नोटीस देऊन अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाणांच्या विचार अन् कार्याला संगीतातून उजाळा! कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली भावपूर्ण आदरांजली

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांनी ३० मार्च २०२६ पर्यंत तहसील कार्यालय, कराड (संजय गांधी शाखा) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आधार कार्ड, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी (UDID) कार्डही सादर करणे बंधनकारक आहे.

निर्धारित मुदतीत केवायसी न केल्यास संबंधित लाभार्थ्यांची पेन्शन थांबविण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थ्यांवरच राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पात्र लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ कायम ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Web Title: Pension to be suspended if kyc is not completed final warning to 711 beneficiaries in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Karad news
  • KYC News
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
3

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
4

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.