uddhav Thackeray, rahul gandhi, dhruv rathee
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि यूट्यूबर ध्रुव राठी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अवमानाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत या नेत्यांवर ईव्हीएमबाबत खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, धृव राठी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या निवडणुत भाजप आणि इंडिया आघाडीसाठी खूप प्रतिष्ठेची झाली होती. विशेष म्हणजे इंडिया आघाडीसाठी तर ही निवडणूक अस्तित्वाची लढाई झाली होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. पण विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने ‘छुपी उद्दिष्टे’ साध्य करण्यासाठी ईव्हीएमबाबत एकतर्फी, गैरसमज पसरवून जनतेची दिशाभूल केली. असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात धृव राठी सह या विरोधी पक्षांच्या या नेत्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
भांडुपमधील इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राइट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. धृवराठीसह या सर्व नेतेमंडळींनी इव्हीएमबाबत दिशाभूल करणारी माहिती जनतेत परसवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. गुरुवारी (11 जूलै) न्यायालयाच या याचिकेवर सुनावणी पार पडली. आता न्यायालय यावर काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोग तसेच मुंबई पोलिसांनी ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे. असे असतानाही राहुल गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि धृव राठी यांनी खोट्या, एकतर्फी, आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या. एक षडयंत्र असून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करत या याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी याचिकेत केली आहे.
या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांच्या खंडपिठासमोर झाली. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने राहुल गांधी, उद्धव ठाकरे, ध्रुव राठी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर न्यायालयाचा अवमान कायदा 1971 च्या कलम 2(बी) आणि 12 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांच्यात लढत झाली. अखेरच्या क्षणी रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव केला होता. वायकरांचा हा विजय मॅनेज केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी असतानाही रवींद्र वायकर यांच्या गटाने मतदान केंद्रावर मोबाईल वापरला, असा आरोप करण्यात आला आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली आहे.