Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Surya Ghar Free Electricity Scheme: घरगुती वीजबिल होणार शून्य! प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्र ‘टॉपर

PM Surya Ghar Muft Bijli Yojana: सौरऊर्जा प्रकल्पांच्या तपासणीमध्ये महाराष्ट्राने ६९ हजार प्रकल्पांची तपासणी पूर्ण करून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. उत्तर प्रदेश ६४ हजार, गुजरात ४२ हजार, राजस्थान २७ हजार आणि केरळ १८ हजार प्रकल्पांसह पुढील क्रमांकांवर आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 03, 2026 | 04:45 PM
PM Surya Ghar Free Electricity Scheme

PM Surya Ghar Free Electricity Scheme

Follow Us
Follow Us:

PM Surya Ghar Free Electricity Scheme: घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २९ मे रोजी देशभरात एका दिवसात विक्रमी १५ हजार घरांवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आले. त्यापैकी तब्बल ४,७०० घरांवर सौर प्रकल्प उभारून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले असून, ६ लाखांहून अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या निवडक राज्यांच्या गटात महाराष्ट्राचा समावेश झाल्याबद्दलही कौतुक केले आहे.

Rohit Pawar News: ही कर्जमाफी नाही, तर कर्जवसुली योजना! कर्जमाफीवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप

राज्यात या योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत केली जात आहे. या योजनेत घरगुती ग्राहकांना छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी थेट अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते.

अर्ज स्वीकृती, प्रत्यक्ष प्रकल्प उभारणी आणि तपासणीनंतर प्रकल्प सुरू करणे हे या योजनेतील महत्त्वाचे टप्पे आहेत. मे महिन्यात देशभर विशेष अभियान राबविण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राने आघाडी घेत टॉपर राज्य म्हणून मान मिळविला आहे.

मे महिन्यात योजनेसाठी राज्यातून ४ लाख ४९ हजार अर्ज प्राप्त झाले असून ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. अर्जांच्या बाबतीत महाराष्ट्रानंतर गुजरात (३ लाख), उत्तर प्रदेश (१ लाख), राजस्थान (४४ हजार) आणि केरळ (३५ हजार) या राज्यांचा क्रमांक लागतो.सौरऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये महाराष्ट्र ५४ हजार प्रकल्पांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत उत्तर प्रदेश ६४ हजार प्रकल्पांसह पहिल्या, गुजरात ३५ हजार, राजस्थान २६ हजार आणि केरळ २० हजार प्रकल्पांसह 4अनुक्रमे पुढील क्रमांकांवर आहेत.

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस! प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ‘कार्यपद्धतीवर नेते नाराज; हायकमांडकडे धाव घेणार?

६९ हजार प्रकल्प तपासणी

सौरऊर्जा प्रकल्पांच्या तपासणीमध्ये महाराष्ट्राने ६९ हजार प्रकल्पांची तपासणी पूर्ण करून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. उत्तर प्रदेश ६४ हजार, गुजरात ४२ हजार, राजस्थान २७ हजार आणि केरळ १८ हजार प्रकल्पांसह पुढील क्रमांकांवर आहेत. सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे काम नोंदणीकृत कंत्राटदारांमार्फत केले जाते. ग्राहकांना आपल्या पसंतीचा कंत्राटदार निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे. कंत्राटदार नोंदणीमध्ये महाराष्ट्र ४१३ नोंदणीकृत कंत्राटदारांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर असून उत्तर प्रदेश (७७९), गुजरात (२१०), आसाम (१८१) आणि राजस्थान (१७७) ही अन्य प्रमुख राज्ये आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्राची कामगिरी :

मे महिन्यात प्राप्त अर्ज : ४.४९ लाख (देशात प्रथम)
बसविलेले सौर प्रकल्प : ५४ हजार (देशात द्वितीय)
तपासणी पूर्ण प्रकल्प : ६९ हजार (देशात प्रथम)
नोंदणीकृत कंत्राटदार : ४१३ (देशात द्वितीय)
२९ मे रोजी एका दिवसात बसविलेले प्रकल्प : ४,७०० (देशात प्रथम)
३ किलोवॅट सौर प्रकल्पासाठी अनुदान : ७८ हजार रुपये
६ लाखांहून अधिक घरांवर सौर प्रकल्प बसविणाऱ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राचा समावेश.

 

Web Title: Pm surya ghar free electricity scheme maharashtra leads nationwide campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Maharashtra Govt
  • maharashtra news
  • Marathi News
  • MSEDCL

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.