Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक; वाशिमच्या मंगरुळपीर येथील घटना

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे बनावट नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना आरोपींच्या गाडीत एका मोठ्या पिशवीत कागदाचे काही बंडल आणि द्रव असे पदार्थ आढळून आले. ज्याचा वापर खोट्या नोटा तयार करण्यासाठी केला जातो. बनावट नोटा बनवण्याचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2024 | 12:18 PM
वाशिममध्ये बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक (फोटो सौजन्य - pinterest)

वाशिममध्ये बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

वाशिमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगरुळपीर पोलिसांनी आरोपींकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्य देखील जप्त केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे ही घटना घडली आहे. सर्व आरोपी नांदेड येथून कारमधून येत होते. यावेळी मंगरुळपीर पोलिसांनी नाकाबंदी करत गाडीमधील तिन आरोपींना अटक केली आहे. तसेच सर्व साहित्य देखील जप्त केलं आहे. आरोपी 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. तर उर्वरित एका ओरापीला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- नगर-बीड-परळी रेल्वे नगरहून मराठवाड्यात धावली; 120 किलोमीटर रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड येथून बनावट नोटांचा व्यवसाय करणारे तिघेजण कारमधून येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली आणि सर्व गाड्यांची तपासणी सुरु करण्यात आली. यावेळी एक गाडी समोरून येत होती, त्या गाडीला अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला परंतु गाडी थांबली नाही. यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा वेग वाढवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. काही अंतर पार केल्यानंतर मंगरुळपीर पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली.

यावेळी पोलिसांना कारमधून एका मोठ्या पिशवीत कागदाचे काही बंडल आणि द्रव असे पदार्थ आढळून आले. ज्याचा वापर खोट्या नोटा तयार करण्यासाठी केला जातो. यानंतर तिन्ही आरोपींना मंगरुळपीर पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत हे तिन्ही आरोपी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा बनवण्याचे साहित्य खरेदी करत असल्याचे समोर आलं. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम बॅगेबाबत अस्पष्ट उत्तरे दिली.

हेदेखील वाचा-सोमवारी अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली, शाळांना सुट्टी जाहीर

पोलिसांनी कडक कारवाई केली असता त्यांनी नांदेड येथील नसरुल्ला खान उर्फ ​​हाजी साहेब नावाच्या व्यक्तीकडून 1 लाख रुपये देऊन 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवण्याचे साहित्य खरेदी केल्याचं सांगितलं. हेच साहित्य आरोपी गाडीमधून घेऊन जात होते, यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर चौथ्या आरोपीला मंगरुळपीर पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.

बँकेत बनावट नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी एकाला अटक

बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये 3 हजार 200 रूपयांच्या नोटा डिपॉझिट केल्या होत्या. 100 रूपयांच्या 9 नोटा, 200 रूपयांच्या च्या 9 नोटा व 500 रूपयाची एक नोट यांचा समावेश आहे. या नोटा बँकेने नाशिक येथे तपासणीसाठी पाठविल्या असत्या त्या बनावट असल्याचे आढळले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Police arrest four people in washim who planning for fake note printing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • vashim
  • vashim news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.